नमस्कार आमच्या आजचा महाराष्ट्र टॉप टेन मराठी न्यूज चॅनेल मधे आपल स्वागत आहे...येथे तुम्हाला ताज्या घडामोडी व बातम्या मिळतील... बातम्या व जाहिरातींसाठी संपर्क - +91 9029198881 करा. आमचे YouTube चॅनेल, Facebook, Telegram ला सबस्क्राईब/ लाईक करा. , माझी माती माझा देश या कार्यक्रमांतर्गत आर्दश रिक्षा चालक मोफत वैद्यकीय तपासणी शिबीर राबविण्यात आला – आजचा महाराष्ट्र

माझी माती माझा देश या कार्यक्रमांतर्गत आर्दश रिक्षा चालक मोफत वैद्यकीय तपासणी शिबीर राबविण्यात आला

प्रतिनीधी नवी मुंबई 

नवी मुंबई( वाशी ) :- माझी माती माझा देश या कार्यक्रमांतर्गत मोफत वैद्यकीय तपासणी शिबीर आयोजित करण्यात आले होते. या शिबिरात मोफत डोळे तपासणी, मोफत चष्मे वाटप छोट्या मोठ्या शारीरिक तपासण्या (रक्त तपासणी, उच्च रक्तदाब तपासणी वगैरे )

करण्यात आल्या. सदर कार्यक्रम उपप्रादेशिक परिवहन कार्यालय नवी मुंबई व नवी मुंबईतील अनेक रिक्षा संघटना यांच्या संयुक्त विद्यमाने हा कार्यक्रम पार पडला याचा फायदा अनेक रिक्षा चालक, मालक व जनसामान्यांना मिळाला. कार्यक्रमात सहाय्यक उपप्रादेशिक परिवहन अधिकारी निकम साहेब, शिंदे साहेब, सानप साहेब, मराठे साहेब, उपस्थित होते तसेच महाराष्ट्र रिक्षा सेनेचे सरचिटणीस श्री. संतोष रावसाहेब च-हाटे, डीआर पाटील रिक्षा चालक मालक संघटनेचे अध्यक्ष श्री. संतोष जाधव,

माय बळीराजा, सुरक्षा रक्षक वाहन चालक, आणि जनरल वर्कर्स युनियनचे महाराष्ट्र राज्याचे संपर्क प्रमुख श्री. नामदेव कदम, नवी मुंबई रिक्षा संघटनेचे अध्यक्ष सुरेश काळे, एकविरा माता रिक्षा युनियनचे विजय पाटील तसेच असंख्य रिक्षा चालक उपस्थित होते.

Whatsapp आयकॉन दाबून ही बातमी शेअर करा 

Advertising Space


मुक्त आणि खऱ्या पत्रकारितेसाठी ती कॉर्पोरेट आणि राजकीय नियंत्रणापासून मुक्त असणे आवश्यक आहे. लोक पुढे येऊन सहकार्य करतील तेव्हाच हे शक्य आहे.

आता दान करा

[responsivevoice_button voice="Hindi Female"]