नमस्कार आमच्या आजचा महाराष्ट्र टॉप टेन मराठी न्यूज चॅनेल मधे आपल स्वागत आहे...येथे तुम्हाला ताज्या घडामोडी व बातम्या मिळतील... बातम्या व जाहिरातींसाठी संपर्क - +91 9029198881 करा. आमचे YouTube चॅनेल, Facebook, Telegram ला सबस्क्राईब/ लाईक करा. , रोहा तालुक्याला न कळलेले कुमार देशपांडे – आजचा महाराष्ट्र

रोहा तालुक्याला न कळलेले कुमार देशपांडे

प्रतिनीधी समीर बामुगडे

रायगड (रोहा) :- रोहा तालुक्यात असा कोणी व्यक्ती नसेल ज्याला कुमार देशपांडे माहित नसतील,आजवर त्यांनी हजारो प्राण्यांवर उपचार केले आणि त्यांना बरे केले ,तसेच कितीतरी लोकवस्ती असलेल्या ठिकाणी स्वतःच्या जीवाची परवा न करता विषारी बिनविषारी सापांना पकडून त्यांना सुखरूपपणे जंगलात सोडले, हे करत असताना २०१३ साली एकदा सापचा दंश सुद्धा त्यांना झाला surgery झाली आणि दादांची एक करंगळी पूर्णपणे गेली तरी

सुद्धा बर झाल्यावर दादांनी अनेक सापांना पकडून त्यांना सुखरूप जंगलात सोडले,सडलेले प्राणी मग तो कुत्रा, गाय, गाढव असो त्या सडलेल्या भागातील किडे काडून ती जखम स्वच्छ करून त्या प्राण्याला बर केले आज तालुक्यात एक ही जखमेने सडलेला कुत्रा नाही,लॉक डाऊन मध्ये पूर्ण वर्षभर सर्व मुक्या जनावरांना अन्न दिल,या २५ वर्षाच्या प्रवासात आजवर ५०-६० हजार प्राण्यांवर उपचार केले आहेत पण या कामाची प्रशासने कधीही दखल घेतली नाही, अनेक विदुषकांना भूषण आणि सन्मान देऊन जिल्ह्याने गौरव केला परंतु या खऱ्या हिऱ्याला ओळखायला प्रशासन कमी पडल, उपचारासाठी लागणाऱ्या पैशासाठी कधीही कोणत्या संस्थेने, सरकारने, कंपनी ने मोठया प्रमाणात मदत केली नाही जी काही तुटपुंजी मदत भेटली ती तालुक्यातील नागरिकांकडून,कुमार दादांनी उपचाराच्या दरम्यान कधीही फोटो किंवा विडिओ सुद्धा काढले नाही, दादांनी या २०-२५ वर्षात उपचारदऱ्यामान कधी ही बाहेर च अन्न पाणी आणि कोणत्याच व्यक्ती कडून उपचाराचे पैसे घेतले नाहीत,आत्ता आम्ही युवक जे दादांसोबत काम करतो ते दादांसोबत भांडून फोटो विडिओ काढल्यामुळे आज दादांचं काम पूर्ण देशभरात पोहचल आहे, आज त्याचं काम बघून माझ्यासारखे कितीतरी तरी युवक संघटित झाले आहेत,आणि त्यांच्या सोबत काम करत आहेत,

अनेक युवकांनी एकत्र येऊन स्थापन केलेली पशु पक्षी जीवनदान संघटना ही आत्ता विशाल मोठया चळवळीच रूप धारण करत आहे. आज संस्थे कडे ambulance आणि जागा नाही आहे तरीसुद्धा हे युवक दादांसोबत जिथे जागा मिळेल तिथे खाली चपला टाकून त्यावर बसून दादांना उपचारासाठी मदत करत आहेत. आज जिल्ह्यातून उपचारासाठी call येत आहेत त्यामुळं लागणाऱ्या औषधांचं , सलाईनचा खर्च वाढत आहे,आर्थिक कमतरतेमुळे संस्थेला सुद्धा मर्यादा येत आहेत पण जसं दादा बोलतात आपण फक्त निमित्त असतो करून घेणार वर बसला असतो तो काहींना काही मार्ग काढत, आपण फक्त मुक्या प्राण्याना बर करायच याच विचारांनी संस्थे मधील युवक आणि कुमार दादा पूर्ण ऊर्जा आणि ताकदीने मुक्या जनावरांना बर करण्यासाठी काम करत आहेत अशा थोर व्यक्तिमत्त्वाला जनतेचा सलाम

Whatsapp आयकॉन दाबून ही बातमी शेअर करा 

Advertising Space


मुक्त आणि खऱ्या पत्रकारितेसाठी ती कॉर्पोरेट आणि राजकीय नियंत्रणापासून मुक्त असणे आवश्यक आहे. लोक पुढे येऊन सहकार्य करतील तेव्हाच हे शक्य आहे.

आता दान करा

[responsivevoice_button voice="Hindi Female"]