सेवानिवृत्त मानसी पेठे मॅडम यांच्या निरोप समारंभाच्या कार्यक्रमास मॅडमना निरोप देते वेळी उपस्थित सर्वचजण झाले भावूक त्यांना बघून मॅडम सुद्धा भावूक झाल्या

रायगड {माणगाव} :- माणगाव ता एज्युकेशन सोसायटी संचलित र. का. गांधी बालवाडी व प्राथमिक विद्यामंदिर गोरेगावच्या मुख्याध्यापिका मानसी मंगेश पेठे मॅडम दि. २८ जुलै २०२३ रोजी 
आपल्या सेवेतून निवृत्त झाल्या पेठे मॅडम १९९७ रोजी मुख्याध्यपिका या पदावर शाळेत रुजू झाल्या मॅडमच्या २६ वर्षांच्या सेवेत त्यांनी अनेक विध्यार्थी घडवले आज तेच विध्यार्थी मोठं मोठ्या शासकीय सेवेत पदसिद्ध अधिकारी तसेच विविध क्षेत्रात आपले नाव कमवित आहेत. मॅडम सेवा निवृत्त होत असताना फार भावुक झाल्या होत्या. 
प्रत्येक शिक्षकांनी आपल्या मनोगतात मॅडम नी केलेल्या कार्याचे गुण गाणं व्येक्त केले त्यांच्या सहकारी शिक्षका सुद्धा फार भावुक झाल्या होत्या ह्या सेवा पूर्ती च्या कार्यक्रमाला मा. ता. एज्युकेशन सोसायटी चे चेअरमन श्रीनिवास बेंडखळे, उप अध्यक्ष अरुणाताई शेट सचिव प्रसाद मराठे, खजिनदार विवेक दोशी,सदस्य मंगेश पेठे, प्रसाद मेहता, अरविंद म्हशेळकर,रावल सर, भालेराव मॅडम तसेच शाळेचे सर्व शिक्षिका व शक्षकत्तेर कर्मचारी उपस्थित होते
|
Whatsapp आयकॉन दाबून ही बातमी शेअर करा |
Advertising Space













