रोहा तालुक्यातील भालगाव येथील तलाठी संतोष चांदोरकर लाच स्वीकारताना अटक

फेरफार नोंद मंजूर करून उतारा देण्यासाठी केली होती लाचेची मागणी
रायगड (रोहा) :- रोहा तालुक्यातील सजा भालगाव येथील तलाठी संतोष मनोहर चांदोरकर वय ४३ वर्षे, तलाठी, सजा भालगांव, अति कार्य. सजा वाली, तालुका रोहा, रायगड वर्ग – ३ राहणार. बेंड्रा कॉम्पलेक्स, रोहा बायपास रोड, तालुका रोहा, रायगड ,यास लाच स्वीकारण्याच्या तयारीत असताना लाच लुचपत प्रतिबंधक विभाग रायगडच्या पथकाने सापळा रचून कारवाई केली आहे. या कारवाईने सर्वत्र खळबळ उडाली आहे.लाचखोर तलाठी 
संतोष मनोहर चांदोरकर यांनी तक्रारदार यांना गट क्रमांक ७८३ क्षेत्र ०१-९९-०० या जमिनीचे फेरफार नोंद मंजूर होऊन उतारा देण्याकरिता तक्रारदार यांच्याकडे लाचेची मागणी केली होती.दिनांक ३०/०५/२०२३ रोजी १०,०००/- रुपये लाच स्वीकारण्याची तयारी दर्शवली. लाच लुचपत प्रतिबंधक विभागाच्या अधिकाऱ्यांनी कारवाई करून लाचखोर तलाठी संतोष चांदोरकर याचेवर दिनांक २६/०७/२०२३ रोजी रोहा पोलीस ठाणे येथे गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
|
Whatsapp आयकॉन दाबून ही बातमी शेअर करा |
Advertising Space













