नमस्कार आमच्या आजचा महाराष्ट्र टॉप टेन मराठी न्यूज चॅनेल मधे आपल स्वागत आहे...येथे तुम्हाला ताज्या घडामोडी व बातम्या मिळतील... बातम्या व जाहिरातींसाठी संपर्क - +91 9029198881 करा. आमचे YouTube चॅनेल, Facebook, Telegram ला सबस्क्राईब/ लाईक करा. , नोव्हेंबरला आखिल भारतीय शिक्षण परिषदेचे खारघरमध्ये आयोजन – आजचा महाराष्ट्र

नोव्हेंबरला आखिल भारतीय शिक्षण परिषदेचे खारघरमध्ये आयोजन

प्रतिनिधि जितीन शेट्टी

डॉ. जी. के. डोंगरगांवकर यांची माहिती

रायगड (पनवेल) :- येत्या २६ नोव्हेंबर ते ५ डिसेंबर या कालावधीत आखिल भारतीय शिक्षण परिषदेचे आयोजन रायगड जिल्हायात करण्याचे व या शिक्षण परिषदेचे निमंत्रक म्हणून सुभाष गायकवाड, महेश साळुंखे, चंद्रसेन कांबळे, विजय गायकवाड, चंद्रकांत जाधव, अँड सुशिल महाडिक, पत्रकार संजय महाडिक, अँड हर्षल शाक्य, एन. एम. वाघमारे, राज सदावर्ते, अँड. पी.एल.गायकवाड़, जिवन जोशी, अनिल मुळे, किशोर शिंदे-पाटील यांची निवड करण्यात आली असल्याची माहिती शिक्षण तज्ज्ञ डॉ जी के डोंगरगावकर यांनी दिली.

 

मुंबई महानगर प्रदेश सामाजिक, शैक्षणिक संस्था समन्वय समिती शाखा पनवेल – नवी मुंबई च्या कार्यकत्र्यांची बैठक शनिवार १५ जूलै २०२३ रोजी डॉ. जी. के. डोगरगावकर यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली. नव्या शैक्षणिक धोरणाची समाजाच्या सर्व घटकात जागृती करणे, संविधानात तरतुद केलेल्या शिक्षण आणि सामाजिक

हक्क आणि बदलत्या संदर्भात ईडब्लूएस आणि अन्य संवर्गातील आर्थिक दुबळयांच्या योजनात सुसंगत फेरबदलाच्या बाबतीत शिक्षण परिषदेच्या आयोजनाबाबत या बैठकीत चर्चा झाली. पनवेल- उरण नवी मुंबई क्षेत्रातील अनेक सामाजिक शैक्षणिक संस्थाचे प्रतिनिधी या बैठकीला उपस्थित होते.यावेळी अनेक ठराव करण्यात आले.१७ सप्टेंबर २०२३ रोजी रायगड जिल्हयातील खाजगी अभिमत विदयापीठ, तांत्रिक व वैदयकिय क्षेत्रातील शैक्षणिक समस्या आणि संविधानिक आरक्षणाची जोपासना ज्यावर अभ्यासक तथा विचारवंताची कार्य शाळा सत्याग्रह महाविदयालय खारघर येथे आयोजित करण्याचे ठरले. तसेच या बैठकीत ३० सप्टेंबर २०२३ रोजी महाराष्ट्रातील तळागळातील दुबळया, आर्थिक आणि सामाजिक घटकांच्या शैक्षणिक सबलीकरणासाठी कार्य केलेल्या शैक्षणिक संस्थाच्या पदाधिक-याची बैठक तथा त्यांच्या समस्या बाबत चर्चा सत्र घेण्याची ठरले. असेही डोंगरगांवकर यांनी सांगितले

Whatsapp आयकॉन दाबून ही बातमी शेअर करा 

Advertising Space


मुक्त आणि खऱ्या पत्रकारितेसाठी ती कॉर्पोरेट आणि राजकीय नियंत्रणापासून मुक्त असणे आवश्यक आहे. लोक पुढे येऊन सहकार्य करतील तेव्हाच हे शक्य आहे.

आता दान करा

[responsivevoice_button voice="Hindi Female"]