सर्वसामान्यांच्या नेत्या दीपिका ताईंचा वाढदिवस उत्साहात साजरा
रायगड (रोहा) :- रोहा येथील राष्ट्रवादी महाराष्ट्र प्रदेश महिला सचिव दीपिका चिपळूणकर यांचा वाढ दिवस तां १३ रोजी रोहा नजिक नीवी येथील त्यांच्या फार्म हाऊस वर मोठ्या उत्साहात साजरा झाला राजकारण समाजकारण आणि व्यवसाय या तिन्ही आघाड्यांवर उल्लेखनीय कार्य करून जनमानसात आपला वेगळा ठसा
यशस्वीरित्या दीपिका ताईंनी उमटवला आहे. त्यांच्या वाढदिवसा निमीत्त विविध कार्यक्रमांचे आयोजन झाले या मध्ये रोठ खुर्द येथे प्रेस संपादक पत्रकार सेवा संघ चे रोहा तालुका अध्यक्ष सचिन मोरे यांनी दीपिका ताईंच्या वाढदिवसाचे औचित्य साधून त्यांच्या उपस्थितीत विद्यार्थ्यांना शालोपयोगी वस्तू वाटप करत वृध्द गरजूंना चादरी वाटप, महिलांना छत्री वाटप हा कार्यक्रम केला व तेथील 
महिलांनी भवानी मंदिर मध्ये ताईंच्या वाढदिवसाचा केक कापला तसेच अन्य ठिकाणी वृक्षारोपण वगैरे उपक्रम राबवले त्या नंतर सायंकाळी नीवि येथील त्यांच्या अक्षय लॉन फार्म हाऊस वर वाढदिवस साजरा करण्यात आला या व्यावसायिक फार्म हाऊस मध्ये रास्त दरात स्विमिंग पूल आणि दोन सुसज्ज सभागृह विविध कार्यक्रमासाठी योग्य भाडे तत्वावर दिली जातात त्यामुळे मराठी महिला उद्योजिका अशी दीपिका ताईंची ओळख निर्माण झाली आहे त्यांच्या वाढ दिवसाला त्यांना अनेक दिवे लावून. ऑक्षण करण्यात आले आणि महिला वर्ग आणि कार्यकर्त्यांनी आणलेले खूप सारे केक कापून वाढदिवस साजरा केला यावेळी नीवी ग्रामस्थ रोहा शहर तालुका व जिल्हाभरातून राष्ट्रवादीचे कार्यकर्ते सर्वपक्षीय नेतेमंडळी तसेच महिला आणि पत्रकारांनी उपस्थिती लावली आणि शुभेच्छा दिल्या महिलावर्गा साठी संगीत खुर्ची आणि फनी गेम्स चे आयोजन केले हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी बचत गट,घरेलु कामगार संघटना,सखी मंच व महिला सुरक्षा संघटने च्या पदाधिकारी राजश्री पाटील आरती कांबळे,अदिती शिंदे,ज्योती भोकटे,सुवर्णा रटाटे,सुप्रिया मोरे विद्या झोलगे,मानसी क्षीरसागर,इंदुलकर व अन्य महिला तसेच दीपक चिपळूणकर ओम चिपळूणकर,अक्षय लॉन चे कर्मचारी यांनी मेहनत घेतली

दीपिका ताईंच्या नेतृत्व कर्तुत्व आणि दातृत्व गुणामुळे रोहेकर महिला आणि कार्यकर्ते येणाऱ्या रोहा नगरपालिकेच्या निवडणुकी साठी नगरसेविका अथवा नगराध्यक्ष पदाचे भावी दावेदार म्हणून पाहत असल्याची चर्चा आहे या बाबत त्याची प्रतिक्रिया विचारली असता त्या म्हणाल्या माझ्या महिला वर्गाने आणि कार्यकर्त्यांनी पुढाकार घेऊन निवडणूक लढविण्याची संधी दिली तर मला रोहेकर जनतेची सेवा करायला निश्चित आवडेल.
|
Whatsapp आयकॉन दाबून ही बातमी शेअर करा |
Advertising Space













