नमस्कार आमच्या आजचा महाराष्ट्र टॉप टेन मराठी न्यूज चॅनेल मधे आपल स्वागत आहे...येथे तुम्हाला ताज्या घडामोडी व बातम्या मिळतील... बातम्या व जाहिरातींसाठी संपर्क - +91 9029198881 करा. आमचे YouTube चॅनेल, Facebook, Telegram ला सबस्क्राईब/ लाईक करा. , आंबेडकरवादी संघर्ष पार्टीचा गोरेगाव तहसील कार्यालयावर २१ जुलैला मोर्चा – आजचा महाराष्ट्र

आंबेडकरवादी संघर्ष पार्टीचा गोरेगाव तहसील कार्यालयावर २१ जुलैला मोर्चा

प्रतिनिधि संजीव भांबोरे

विविध मागण्यांकडे शासनाचे लक्ष वेधून घेणार

गोंदिया :- आंबेडकरवादी संघर्ष पार्टीच्या वतीने गोंदिया जिल्ह्यातील गोरेगाव तहसील कार्यालयावर २१ जुलै २०२३ रोज शुक्रवारला दुपारी बारा गोरेगाव बस स्टॉप जवळून मोर्चाचे आयोजन करण्यात आलेले आहे .या मोर्चाचे नेतृत्व आंबेडकरवादी संघर्ष पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष

आय एल नंदागवळी हे करणार आहेत. काढण्यात येणाऱ्या मोर्चाच्या प्रमुख मागण्यांमध्ये श्रावण बाळ ,विधवा महिला, दिव्यांग निराधार ,शेतकरी, शेतमजूर ,कामगार, सुशिक्षित बेरोजगार, महिला समूह गट ,रास्त भाव दुकानदार व केरोसीन दुकानदार यांच्या प्रमुख मागण्या करता या मोर्चाचे आयोजन करण्यात आलेले आहे. मागण्यांमध्ये श्रावण बाळ( वृद्ध), विधवा महिला, दिव्यांग ,निराधार, यांना प्रत्येक महिन्याला पगार देण्यात यावा. विधवा महिला व दिव्यांग यांचे २५ वर्षाचे मूल झाल्यानंतर पगार बंद न करता सुरू ठेवण्यात यावे. ६० वर्षानंतर शेतकरी, शेतमजूर ,कामगारांना कोणतीही अट न लावता लावता ६००० रुपये महिना देण्यात यावा जबरन ज्योत शेती वाहणाऱ्यांना मालकी हक्काचे पट्टे देण्यात यावे ,इलेक्ट्रिक बिल दर महिन्याला दोनशे युनिट पर्यंत माफ करण्यात यावे ,वृद्ध ,विधवा महिला, दिव्यांग, निराधार यांना घरकुल देण्यात यावे, महिलांसाठी एसटी भाडे १००% मोफत करण्यात यावे, मुलींना लग्न करता व शिक्षणाकरता दोन लाख रुपये अनुदान देण्यात यावे ,किरायादार यांना घरकुल देण्यात यावे ,मोलकरीण यांना १० ,००० हजार महिना देण्यात यावा ,सफाई कामगारांना १८,००० हजार रुपये महिना देण्यात यावा, सरपंच ,पोलीस पाटील ,कोतवाल अंगणवाडी सेविका, मदतनीस ,ग्रामपंचायत चपराशी ,ग्रामपंचायत रोजगार सेवक ,केरोसीन व रास्त भाव दुकानदार ,पत्रकार ,सामाजिक कार्यकर्ते ,आशा वर्कर, नर्स ,शाळेमध्ये अण्णा शिजवणारे यांना वीस हजार रुपये मानधन देण्यात यावा ,इत्यादी मागण्यांकरिता मोर्चाचे आयोजन करण्यात आलेले आहे. करिता या मोर्चामध्ये जास्तीत जास्त संख्येने सहभागी होण्याचे आवाहन आयोजका मार्फत मार्फत करण्यात आलेले आहे.

Whatsapp आयकॉन दाबून ही बातमी शेअर करा 

Advertising Space


मुक्त आणि खऱ्या पत्रकारितेसाठी ती कॉर्पोरेट आणि राजकीय नियंत्रणापासून मुक्त असणे आवश्यक आहे. लोक पुढे येऊन सहकार्य करतील तेव्हाच हे शक्य आहे.

आता दान करा

[responsivevoice_button voice="Hindi Female"]