आषाढी एकादशी निमित्त मोफत नेत्र तपासणी शिबिर

रत्नागिरी (खेड) :- आषाढी एकादशी निमित्त गुरुवर्य काशिनाथ दळवी महाराज वारकरी संप्रदाय वतीने मोफत नेत्र तपासणी शिबिर श्री. संभाजी लवंदे साहेब मनसे विभाग अध्यक्ष यांच्या प्रयत्नाने आयोजित करण्यात आले. हा कार्यक्रम मोठ्या उत्साहात संपन्न झाला. आषाढी एकादशी निमित्त खवटी येथे गुरुवर्य काशिनाथ दळवी महाराज मोफत नेत्र तपासणी शिबिरात खवटी येथील
पंचक्रोशीतील भाविकांनी लाभ घेतला खेड मधील प्रसिध्द असलेल्या इन्फिगो नेत्र तपासणी सेंटर यांच्या मार्फत तपासणी शिबिराचे आयोजन केले होते. या कार्यक्रमासाठी आलेल्या मान्यवरांचे सत्कार करण्यात आले.मान्यवर खवटी गावचे सरपंच श्री. शैलेश दळवी, एच.पी. प्रसाद दळवी ह.भ.प. शर्मिला दळवी, ह.भ.प. एकनाथ दळवी महाराज, चंद्रकांत भोसले, दिपाली दळवी, अपूर्वा लाड, अनिता दळवी, गणपत सुतार, शांताराम दळवी, दिलीप दळवी व पंचक्रोशीतील भाविक मंडळी उपस्थित होती. कार्यक्रमाचे सुत्रसंचलन प्रमोद दळवी यांनी केले.
|
Whatsapp आयकॉन दाबून ही बातमी शेअर करा |
Advertising Space













