नमस्कार आमच्या आजचा महाराष्ट्र टॉप टेन मराठी न्यूज चॅनेल मधे आपल स्वागत आहे...येथे तुम्हाला ताज्या घडामोडी व बातम्या मिळतील... बातम्या व जाहिरातींसाठी संपर्क - +91 9029198881 करा. आमचे YouTube चॅनेल, Facebook, Telegram ला सबस्क्राईब/ लाईक करा. , शेतकर्‍यांनी शासनाच्या योजनांचा लाभ घ्यावा – आ . भरतशेठ गोगावले – आजचा महाराष्ट्र

शेतकर्‍यांनी शासनाच्या योजनांचा लाभ घ्यावा – आ . भरतशेठ गोगावले

प्रतिनिधि पांडुरंग माने

गोरेगांव – लोणेरे प्रेस असोसिएनच्या वतीने शेतकरी सन्मान सोहोळा

रायगड (माणगाव) :- युती सरकारने शेतकर्यांच्या सर्वांगिण विकासासाठी अनेक योजना आणल्या आहेत . त्याचा लाभ शेतकर्यांनी घ्यावा , असे आवाहन करून , आपल्या दारी या अंतर्गत मुख्यमंत्री , उपमुख्य मंत्री आपल्या जिल्ह्यात , तालुक्यात , गावात येवून शासनाच्या शेतकर्‍यांसाठी असलेल्या योजनांची माहिती तर देतेच पण शेतकर्‍यांना तेथल्या तेथे या योजनांचा लाभ देत असल्याचे प्रतिपादन आ . भरतशेठ गोगावले यांनी गोरेगांव येथे केले
रायगड प्रेस क्लब संलग्न त्यांच्या मार्गदर्शनाखाली गोरेगांव – लोणेरे प्रेस असोसिएशन च्या वतीने प्रगतीशील शेतकर्‍यांना आ. गोगावले यांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले , त्यावेळी ते बोलत होते . या कार्यक्रमास सरपंच झुबेर अब्बासी , सहाय्यक पोलीस निरीक्षक श्रीकृष्ण नावले , रायगड प्रेस क्लबचे जिल्हा संपर्क प्रमुख भारत गोरेगांवकर , गोरेगांव लोणेरे प्रेसचे अध्यक्ष केदार खुळे , मधुकर नाडकर यांच्यासह सन्मानपात्र शेतकरी श्रीराम दीपक करकरे आणि रामा सखाराम मोरे , दिनेश हरवंडकर , सचिन शिगवण , मंगेश कदम , नागांवचे सरपंच वामन बैकर तसेच कुणनी युवा मंचचे पदाधिकारी , गोरेगांव ग्रामपंचायतीचे सर्व सदस्य आणि परिसरातील शेतकरी वर्ग उपस्थित होता .यावेळी आ . गोगावले यांच्या हस्ते श्रीराम करकरे आणि रामा मोरे या दोन शेतकऱ्यांचा सन्मानपत्र , शाल आणि रोपटे देवून सन्मान करण्यात आला .हा कार्यक्रम यशस्वी करण्यासठी गिरीश गोरेगांवकर , वैभव टेंबे , पियुष भोसले , मुकेश कडू यांनी मेहनत घेतली .

Whatsapp आयकॉन दाबून ही बातमी शेअर करा 

Advertising Space


मुक्त आणि खऱ्या पत्रकारितेसाठी ती कॉर्पोरेट आणि राजकीय नियंत्रणापासून मुक्त असणे आवश्यक आहे. लोक पुढे येऊन सहकार्य करतील तेव्हाच हे शक्य आहे.

आता दान करा

[responsivevoice_button voice="Hindi Female"]