चिंचवली ग्रामस्थ मंडळ अध्यक्षपदी चंद्रकांत भोसले यांची निवड

रायगड (माणगाव) :- माणगांव तालुक्यातील एक आदर्श गाव म्हणून चिंचवळीवाडी ह्या गावच नाव आवर्जून घेतल जात या गावाला कानू आण्णा उचाटे यांनी गेली अनेक वर्षे पासून गावच गावपन जपून ठेवले आहे. या गावातील ग्रामस्थ एका छताखाली अगदी गुण्यागोविंदानं नांदत आहेत गावचा सार्वजनिक सलोखा राखण्याचे काम केले जाते या साठी गावातर्फे अध्यक्ष निवडला जातो. यावेळी तरुण तडफदार माजी उपसरपंच चंद्रकांत भोसले यांची सर्वानुमते अध्यक्ष पदी निवड करण्यात आली. भोसले हे
मनमिळावू स्वभावचे आणि सर्व गावात परिचित असणारे चिंचवली ग्रामपंचायत चे माजी उपसरपंच म्हणून पाच वर्ष उत्तम काम केले आहे. त्यांचा सामाजिक क्षेत्रातील उत्तम काम असून तरुणांना एकत्रीत करून गावच गावपण जपून चिंचवळी गाव विकास कामात प्रगतीची च्या दिक्षेने नक्की वाटचाल करतील या दृष्टीने चंद्रकांत भोसले यांची दि. ७ रोजी ग्रामस्थ मंडळाच्या अध्यक्षपदी व खजिनदार पदी ग्रामपंचायत सदस्य सुधाकर जामदार यांची बिनविरोध निवड करण्यात आली यावेळी

ज्येष्ठ समाजसेवक, रायगड भुषण, अण्णा उचाटे, यांच्या मार्गदर्शनाखाली, माजी सरपंच, कृष्णा तटकरे, माजी अध्यक्ष विष्णू तटकरे , सरपंच नंदू रमेश पारावे, व सर्व पदाधिकारी व सर्व ग्रामस्थ मंडळ यावेळी उपस्थित होते
तर चंद्रकांत भोसले यांची अध्यक्ष पदी निवड झाल्याबद्दल बी.टी कार्पोरेशन लोणेरे याचे मालक तानाजी दळवी, प्रभाकर पुजारी, गजानन भोईर, राजू पाटील सौरभ दळवी,लक्षुमन भोईर, कैलास रातवडकर,दिपक भोस्तेकर, राम भोस्तेकर,दिपक भोस्तेकर, किरण शिंदे, अजय भोसले,विठू करकरे, मिलिंद करकरे, आदीनी पुष्पगुच्छ देवून जंगी स्वागत केले. आणि पुढिल वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
|
Whatsapp आयकॉन दाबून ही बातमी शेअर करा |
Advertising Space













