हातपंपाला येतो दूषित पाणी पुरवठा युवा कार्यकर्ता तर्फे पालोरा येथील ग्रामपंचायतीला निवेदन
प्रतिनिधि संजीव भांबोरे
भंडारा :- पवनी तालुक्यातील पालोरा आबादी येथील बौद्ध विहारा समोरील हातपंपाला दूषित पाणीपुरवठा होत असल्यामुळे आबादी येथे पिण्याच्या पाण्याची अडचण भासत आहे. एक ते दिड वर्षापासून पाणी पिण्यायोग्य मिळत नसल्यामुळे या बोरींगला काय समस्या आहे याकडे लक्ष देण्यात यायला हवे . पिण्याच्या पाण्यासाठी शेताच्या पलीकडे जाऊन मेन रोड ओलांडून जावे लागते 
त्यामुळे येथे कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून सदर हातपंप लवकर दुरुस्त करावा अशी भूमिका घेत पालोरा आबादी येथील युवा नागरिकांनी ग्रामपंचायत पदाधिकारी उपसरपंच प्रवीण खोपे यांना निवेदन दिले व लवकरात लवकर कार्यवाही न केल्यास आपल्या ग्रामपंचायत समोर उपोषण करण्यात येईल असे युवा कार्यकर्ता अभिषेक मेश्राम, साहिल मेश्राम, समीर शेंडे, अमित धारगावे, प्रयास धारगावे, प्रीतम रामटेके, युवराज गिरहेपुंज, सुभम धारगावे, प्रथमेश टेटे, गौरव रंगारी, अभय पुंड, सोनू गोंडाने, देवा रंगारी व गावतील नागरिकांच्या उपस्थितीमध्ये निवेदन देण्यात आले.
ग्रामपंचायत पदाधिकाऱ्यांनी पंधरा दिवसांचा वेळ मागितला आहे पंधरा दिवसाच्या आत हातपंप दुरुस्त न झाल्यास आम्ही गावातील सर्व नागरिकांना घेऊन ग्रामपंचायत कार्यालया सामाेर उपोषण करू. असे अभिषेक मेश्राम/साहिल मेश्राम युवा कार्यकर्ता पालोरा (चौ) यांनी सांगितले
|
Whatsapp आयकॉन दाबून ही बातमी शेअर करा |
Advertising Space













