वाढदिवसाचे औचित्य, समाजसेवेची प्रचिती; माणगाव उपजिल्हा रुग्णालयाला खाडे परिवाराची मोलाची भेट”.
प्रतिनिधी
रायगड ( माणगाव ) :- वाढदिवसाचे औचित्य साधत श्री. संतोष संगीता सिताराम खाडे यांनी माणगाव उपजिल्हा रुग्णालयातील प्रसूतीगृहासाठी नवीन प्रवेशद्वार उभारून समाजोपयोगी उपक्रम राबविला. या कार्यात खाडे परिवारासोबत श्री. जितेंद्र लक्ष्मण भोनकर यांचेही मोलाचे योगदान लाभले.प्रसूतीगृहाचे जुने प्रवेशद्वार जीर्ण झाल्याने गर्भवती महिला, रुग्ण व त्यांच्या नातेवाईकांना गैरसोयींचा सामना करावा लागत होता. ही गरज लक्षात घेऊन नवीन प्रवेशद्वार उभारण्यात आले. त्यामुळे प्रसूतीगृह अधिक सुरक्षित व 
सुसज्ज झाले आहे.श्री. संतोष खाडे हे यापूर्वीही रुग्णालयासाठी औषधे, इंजेक्शन, सलाईन, बाके, पंखे तसेच इतर आवश्यक साहित्य उपलब्ध करून देत आले आहेत. रुग्णालयाच्या विविध गरजांसाठी ते नेहमीच मदतीचा हात पुढे करत असतात.यावेळी उपजिल्हा रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. महेश मेहता, प्रसूती विभागाचे डॉ. रामदास, गवळी मॅडम, साळवी साहेब, वैशाली मॅडम, अनिलजी तेटगुरे, ज्ञानेश्वर उतेकर, श्री. जितेंद्र भोनकर, पानसरे काका तसेच समाजातील मान्यवर उपस्थित होते.याप्रसंगी श्री. संतोष खाडे यांनी समाजातील दानशूर व्यक्तींना आवाहन करताना, “गरजू व गरजवंत रुग्णांच्या मदतीसाठी प्रत्येकाने आपल्या परीने हातभार लावावा. समाजाच्या सहकार्यामुळे अनेक रुग्णांना दिलासा मिळू शकतो,” असे मत व्यक्त केले.
|
Whatsapp आयकॉन दाबून ही बातमी शेअर करा |
Advertising Space













