स्व.श्री.अमोल भाऊ मस्के यांच्या जन्मदिनी वृद्धांना ब्लॅंकेटचे वाटप…

भंडारा :- तालुक्यातील गणेशपुर येथील स्वर्गीय इंजी. अमोल मस्के यांच्या जन्मदिनानिमित्त बेला येथील वृद्धाश्रम मध्ये अनेक वृद्धांना ब्लॅंकेट चे वाटप करण्यात आले. यावेळी स्व. अमोल मस्के यांच्या जीवनावर आधारित बाबी सांगून त्यांना सामूहिक श्रद्धांजली देण्यात आली. अमोल मस्के हे पवन मस्के यांचे ज्येष्ठ बंधू असून 
त्यांच्यासोबत नियमित सामाजिक क्षेत्रामध्ये अग्रेसित राहून समाजासाठी अनेक चळवळी मध्ये सोबत राहिलेले आहेत .
यावेळी समाजसेवक तथा काँग्रेस कमिटी सचिव पवन मस्के , सौ.निकिता मस्के ,व्यवस्थापक मंडळ अजय वानखेडे, सौ.सुप्रिया निकोसे अधीक्षक ,सौ. वर्षा पोहरे सौ.नूतन करवाडे ,सौ. तारा मस्के सौ. विद्या सुखदेवे, मोठ्या संख्येने वृद्धगण उपस्थित होते. यावेळी अमोल मस्के यांच्या जीवनावर प्रकाश टाकत त्यांनी केलेल्या चांगल्या कार्याचे कौतूक करण्यात आले।
|
Whatsapp आयकॉन दाबून ही बातमी शेअर करा |
Advertising Space













