रोह्यात बकरी ईद आणि आषाढी एकादशी च्या निमित्त रोहा पोलिसांकडून मॉकड्रिल आणि रूट मार्च चे प्रदर्शन…

रोह्यात कोणतेही गैर प्रकार होऊ नये म्हणून केले पोलीस संचालन…
रायगड (रोहा) :- दिनांक 23 जून रोजी आगामी येणाऱ्या बकरी ईद आणि आषाढी एकादशी निमित्त सणांच्या पार्श्वभूमीवर रोहा पोलिसांच्या माध्यमातून मॉकड्रील आणि रूट मार्च चे प्रदर्शन करण्यात आले. शहरात कोणतेही गैरप्रकार होऊ नये म्हणून यासाठी 
पोलीस संचालन करण्यात आले. रोहा शहरातील नदी संवर्धन येथे रोहा पोलिसांकडून प्रात्यक्षिक करून रोहा पोलीस निरीक्षक प्रमोद बाबर, महिला पोलीस उपनिरीक्षक सोने जवादे यांच्या मार्गदर्शनाखाली आज रोहे शहरात रूट मार्च करण्यात आले. रोहा एसटी स्टँड येथे रूट मार्च ची सुरुवात करून रोहा नगरपालिका ,राम 
मारुती चौक, रोहा मोहल्ला, तीन बत्ती नाका, पोलीस चौकी येथून मार्गस्थ होऊन पुन्हा एसटी स्टँड येथे विसर्जित करण्यात आले. यावेळी रोहा पोलीस निरीक्षक प्रमोद बाबर महिला पोलीस उपनिरीक्षक सोनी जवादे यांच्यासह रोहा पोलीस स्टाफ उपस्थित होता…
|
Whatsapp आयकॉन दाबून ही बातमी शेअर करा |
Advertising Space













