नमस्कार आमच्या आजचा महाराष्ट्र टॉप टेन मराठी न्यूज चॅनेल मधे आपल स्वागत आहे...येथे तुम्हाला ताज्या घडामोडी व बातम्या मिळतील... बातम्या व जाहिरातींसाठी संपर्क - +91 9029198881 करा. आमचे YouTube चॅनेल, Facebook, Telegram ला सबस्क्राईब/ लाईक करा. , रायगड जिल्हा परिषद शाळा पळसगाव खुर्द तालुका माणगाव या शाळेत जागतिक योग दिन उत्साहात साजरा – आजचा महाराष्ट्र

रायगड जिल्हा परिषद शाळा पळसगाव खुर्द तालुका माणगाव या शाळेत जागतिक योग दिन उत्साहात साजरा

प्रतिनिधि पांडुरंग माने

रायगड (माणगाव) :- २१ जून २०२३ या दिवशी पळसगाव खुर्द शाळेमध्ये जागतिक योग दिन साजरा करण्यात आला. सुरुवातीला शाळेचे मुख्याध्यापक श्री अजिनाथ ढवाण सर यांनी योग दिनाचे महत्त्व सांगितले. श्री गणेश खामकर सर यांनी पूरक हालचाली घेऊन योगासनाचे प्रात्यक्षिक करून दाखवले. यामध्ये बैठक स्थिती, दंड स्थिती , इतर आसने, कपालभाती, प्राणायाम ,ध्यान करून दाखवले. विद्यार्थ्यांचा उत्तम प्रतिसाद होता. यावेळी सौ. चव्हाण ,श्रीमती बावधने मॅडम उपस्थित होत्या. योगासने नियमित केल्याने शरीराची उंची वाढते,एकाग्रता वाढते,स्नायू व सांधे मजबूत होतात,श्वसन क्षमता वाढते,पचनक्रिया सुधारते याची माहिती दिली .नंतर श्रीमती बावधने मॅडमनी आभार मानून कार्यक्रमाची सांगता केली.

Whatsapp आयकॉन दाबून ही बातमी शेअर करा 

Advertising Space


मुक्त आणि खऱ्या पत्रकारितेसाठी ती कॉर्पोरेट आणि राजकीय नियंत्रणापासून मुक्त असणे आवश्यक आहे. लोक पुढे येऊन सहकार्य करतील तेव्हाच हे शक्य आहे.

आता दान करा

[responsivevoice_button voice="Hindi Female"]