नमस्कार आमच्या आजचा महाराष्ट्र टॉप टेन मराठी न्यूज चॅनेल मधे आपल स्वागत आहे...येथे तुम्हाला ताज्या घडामोडी व बातम्या मिळतील... बातम्या व जाहिरातींसाठी संपर्क - +91 9029198881 करा. आमचे YouTube चॅनेल, Facebook, Telegram ला सबस्क्राईब/ लाईक करा. , खवटी हायस्कूल व ज्युनिअर कॉलेजमध्ये शासकीय स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन संपन्न – आजचा महाराष्ट्र

खवटी हायस्कूल व ज्युनिअर कॉलेजमध्ये शासकीय स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन संपन्न

पत्रकार राजेंद्र दळवी

रत्नागिरी (खेड) :- खवटी पंचक्रोशी शिक्षण संस्था खवटी संचलित न्यू इंग्लिश स्कूल व श्री .पि .के. दरेकर जुनिअर कॉलेजमध्ये कोकण विकास समिती ग्रामीण व शहरी विभाग अंतर्गत तिमिरातून तेजाकडे या उपक्रमातर्फे शासकीय स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन रविवार दिनांक १८ /०६/२०२३ रोजी सकाळी ०७:०० वाजता आयोजित करण्यात आले.

या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी खवटी पंचक्रोशी शिक्षण संस्थेचे उपाध्यक्ष मा. श्री. दिलीपजी राणे साहेब व सचिव मा.श्री. चंद्रकांत दळवी , खजिनदार श्री. वैभवजी दरेकर ,प्रमुख वक्ते मा. श्री .सत्यवान यशवंत रेडकर साहेब मुख्याध्यापक श्री माळी सर ज्येष्ठ शिक्षिका सौ. नवले मॅडम, सौ.

कोदारे मॅडम, श्री. प्रमोद दळवी सर ,तसेच सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी , इयत्ता पाचवी ते बारावीपर्यंतचे आजी आणि माजी विद्यार्थी, पालक श्री.रमेश दळवी ,श्री. विकास दरेकर उपस्थित होते. या कार्यक्रमाची सुरुवात सरस्वती पूजन व प्रार्थनेने करण्यात आली .तसेच प्रमुख वक्ते मा. श्री. सत्यवान यशवंत रेडकर साहेब यांचे स्वागत मा. श्री. दिलीपजी राणे साहेब व श्री. चंद्रकांत दळवी साहेब यांच्या हस्ते शाल व पुष्पगुच्छ देऊन करण्यात आले. या कार्यक्रमाचे प्रमुख मार्गदर्शक मा. श्री. रेडकर साहेब हे (कनिष्ठ अनुवाद अधिकारी मुंबई सीमा शुल्क भारत सरकार) तसेच संस्थापक व प्रमुख मार्गदर्शक आहेत. यांनी इयत्ता दहावी व इयत्ता बारावी नंतर विद्यार्थ्यांना विविध प्रकारच्या शासकीय स्पर्धा परीक्षा संदर्भात सखोल मार्गदर्शन करण्यात आले. तसेच संस्थेचे उपाध्यक्ष श्री दिलीपजी राणे साहेब व खजिनदार श्री. वैभव दरेकर साहेब यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. इयत्ता दहावीतील कु. अपेक्षा धोत्रे व इयत्ता बारावीतील कु. मेहेक जोगीलकर हिने मनोगत व्यक्त केले तसेच श्री. रेडकर साहेबांना शुभेच्छा देण्यात आल्या. सदर कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी संस्थेचे अध्यक्ष मा. श्री. भालचंद्र बेलोसे ,खजिनदार श्री. वैभव दरेकर, सर्व संचालक मंडळ यांनी सहकार्य केले .ज्युनियर कॉलेजचे प्राध्यापक श्री. दळवी सर यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व उपस्थित मान्यवरांचे व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी विद्यार्थी, पालक यांचे आभार मानण्यात आले.

Whatsapp आयकॉन दाबून ही बातमी शेअर करा 

Advertising Space


मुक्त आणि खऱ्या पत्रकारितेसाठी ती कॉर्पोरेट आणि राजकीय नियंत्रणापासून मुक्त असणे आवश्यक आहे. लोक पुढे येऊन सहकार्य करतील तेव्हाच हे शक्य आहे.

आता दान करा

[responsivevoice_button voice="Hindi Female"]