नेरूळ मधील विरेंद्र यशवंत म्हात्रेंचा प्रामाणिकपणा
प्रतिनिधि समीर बामुगडे
नवी मुंबई : नेरुळ सेक्टर २० येथून चालत येत असताना लायन हार्ट ग्रुप नवी मुंबई चे संस्थापक अध्यक्ष विरेंद्र म्हात्रे यांना एका नागरिकाचे पाकीट सापडले असता विरेंद्र म्हात्रे यांनी नेरूळ पोलीस स्टेशन चे निरीक्षक महेश पाटील यांना फोनवरून सदर घटनेची माहिती दिली.
पाकिटात महत्त्वाची कागदपत्रे होती. कागदपत्रांवर असलेल्या नावावरून सदर नागरिकांचे नाव किष्णा अनसंदा असल्याचे म्हात्रे यांच्या लक्षात आले. कागदपत्रांवर असलेल्या पत्याच्या आधारे विरेंद्र म्हात्रे यांनी रात्री अकरा वाजण्याच्या सुमारास किष्णा अनसंदा यानां फोन वरून महिती दिली. म्हात्रे यांनी त्यांना बोलावून पाकीट देऊ करताच किष्णा अनसंदा भावूक झाले. त्यांनी लायन हार्ट ग्रुप नवी मुंबई चे संस्थापक / अध्यक्ष विरेंद्र यशवंत म्हात्रे यांचे गळा भेट घेऊन आभार मानले.
|
Whatsapp आयकॉन दाबून ही बातमी शेअर करा |
Advertising Space













