नमस्कार आमच्या आजचा महाराष्ट्र टॉप टेन मराठी न्यूज चॅनेल मधे आपल स्वागत आहे...येथे तुम्हाला ताज्या घडामोडी व बातम्या मिळतील... बातम्या व जाहिरातींसाठी संपर्क - +91 9029198881 करा. आमचे YouTube चॅनेल, Facebook, Telegram ला सबस्क्राईब/ लाईक करा. , पेटीच्या फॉर्म भरण्याकरता मोजावे लागतात हजारो रुपये – आजचा महाराष्ट्र

पेटीच्या फॉर्म भरण्याकरता मोजावे लागतात हजारो रुपये

प्रतिनिधि संजीव भांबोरे

        सरकारच्या योजनेला बनविले लुटमार योजना

भंडारा :- पवनी तालुक्यामध्ये पेटीचे फॉर्म भरण्याकरता दोन हजार रुपये मोजावे लागत असून सरकारच्या या योजनेला गोरगरिब मजुरांना लुटमार करणारी योजना असे म्हणायला काही हरकत नाही. सरकार मार्फत इमारत बांधकाम कामगार विभाग म्हणून आलेली एक योजना आहे. जे कोणी गोरगरीब मजदूर आहेत त्यांच्या साठी

बनवलेली ही एक योजना आहे. मात्र पवनी तालुक्यात त्या योजनेसाठी मोजावे लागत आहेत दोन हजार रुपये न्यू फॉर्म ऑनलाईन भरून १०० रुपयात काम व्हायच ते काम आता करून देतो म्हणून सरकारी कामगार २००० रुपये घेत असून हा प्रकार सगळीकडे सुरू आहे .याकडे प्रशासन मात्र दुर्लक्ष करत आहे. ऑनलाइन नेट कॅफे वाले व इतर व्यक्ती म्हणतात की ठेकेदाराची साईन लागते यासाठी ठेकेदार पैसे घेतो असे म्हणून मोठ्या प्रमाणात लूटमार सुरू आहे. तसेच बांधकाम विभाग येथील कर्मचाऱ्यांना अर्धे पैसे द्यावे लागतात असे सांगून लोकांकडून हजारो रुपयांची लुटमार करण्यात येत आहे. या योजनेमार्फत जे काही फायदे नागरिकांना होतात. त्यातील ५०% वरच्या बांधकाम विभाग येथील अधिकाऱ्यांना द्यावे लागतात. असं म्हटलं जात आहे. नागरिकांची मोठ्या प्रमाणात लूटमार होत असून, या लुटमारीकडे अजून प्रशासनाने लक्ष वेधले नाही. असं पण म्हटलं जात आहे की,ही एक मोठी संस्था आहे सगळीकडे पसरलेली आहे सरकारी कर्मचारी व अधिकाऱ्यांच्या संगनमताने हे काम होत आहे असे स्पष्ट पण दिसून येत आहे. स्थानिक प्रशासनाने त्याकडे लवकरात लवकर लक्ष देऊन सखोल चौकशी करण्यात यावी अशी मागणी नागरिकां कडून होत आहे.

प्रतिक्रिया- काम शंभर टक्के करून देतो म्हणून आमच्या भागामध्ये मोठ्या प्रमाणात पेटीचे फार्म साठी हजार – हजार रुपये लागतील असे म्हणून गोरगरीब मजुरांकडून पैसे घेतले जात आहेत . हा प्रकार थांबावा म्हणून स्थानिक प्रशासनाने याकडे लवकरात लवकर लक्ष देण्याची गरज आहे.

शिशुपाल रामटेके सरपंच पालोरा (चौरास)

Whatsapp आयकॉन दाबून ही बातमी शेअर करा 

Advertising Space


मुक्त आणि खऱ्या पत्रकारितेसाठी ती कॉर्पोरेट आणि राजकीय नियंत्रणापासून मुक्त असणे आवश्यक आहे. लोक पुढे येऊन सहकार्य करतील तेव्हाच हे शक्य आहे.

आता दान करा

[responsivevoice_button voice="Hindi Female"]