भोकरदन मध्ये सोयाबीनच्या बोगस बियांण्याचा साठा जप्त भोकरदन कृषी विभागाची कार्यवाही..

शेतकरी बांधवांनो सावधान बोगस बियाणे शेतकऱ्यांनी घेऊ नये
जालना (भोकरदन) :- जालना जिल्ह्यातील भोकरदन तालुक्यातील- राजुर रस्त्यावरिल बरांजळा पाटीजव असलेल्या केळणा पूर्णा प्रोड्युसर कंपनीच्या बाजुला एका पत्र्याच्या शेडमध्ये सोयाबीनच्या बोगस बियाण्यांची पँकींग सुरु असल्याची गुप्त माहिती भोकरदन कृषी विभागाला मिळाल्या नंतर दुपारी साडे चार वाजेदरम्यान कृषी विभागामार्फत त्या स्थळी जाऊन ही धडक कार्यवाही करण्यात आली आहेत. यामध्ये पंचविस किलो पॅकिंग वजन असलेल्या तब्बल ३३२ विना लॉट नंबर, विना पॅकिंग तसेच विना एक्सपायर डेट नसलेल्या बॅगांचा मोठा साठा आढळुन आला आहे.
यावेळी सदर गोडाउन चालविणारे विजय गंगाराम म्हस्के रा. बरांजळा लोखंडे व पॅकिंगचे काम पाहाणारे सुनिल भाऊसाहेब कऱ्हाळे यांना सुरु असलेल्या पॅकिंग बाबत अधिकाऱ्यांनी विचारणा केली असता त्यांनी कोणतीही माहीती दिली नाही म्हणुन सदर पॅकिंग होत असलेल्या बोगस
बियाण्याचा साठा जप्त करण्यात आला असुन त्यावर विक्री बंदी आदेश देण्यात आले आहेत. या नावाने सोयाबिनची पॅकिंग गोडाउन मध्ये लोकप्रिय सिड्स प्रा.ली. तेलंगणा या कंपनीचे के.डी. एस. ७३६ ( फुले संगम ) सोयाबिनचे बियाणे पॅकींग सुरु असतांना आढळुन आले आहेत. यात या पंचविस किलो पॅकिंगच्या २१३ बॅगा आढळुन आल्या

तर बायडेन अँग्रोव्हेट प्रा.लि. हनुमान नगर गारखेडा परिसर संभाजीनगर या नावाने पॅकेट डबल सेवन उत्पादित केलेल्या सोयाबीनच्या एकुण ११९ बॅगा आढळुन आल्या आहेत विशेष म्हणजे यात लॉटनंबर उत्पादित तारिख नमुद नसल्यामुळे हा साठा बोगस असल्याचे दिसून आले आहे.
या कार्यवाहीत तालुकाकृषी अधिकारी श्री. भुते बियाणे निरिक्षक आर. यल. तांगडे पं.सं. भोकरदन, कृषी सहाय्यक एस.जी. रोकडे, पी.पी. भोपळे यांनी काम पाहीले आहेत
अशी माहीती कृर्षी विभागाकडून मिळाली आहे
आजचा महाराष्ट्र सामान्य जनतेच हक्काच न्यूज चैनल टॉप 10 न्यूज
|
Whatsapp आयकॉन दाबून ही बातमी शेअर करा |
Advertising Space













