नमस्कार आमच्या आजचा महाराष्ट्र टॉप टेन मराठी न्यूज चॅनेल मधे आपल स्वागत आहे...येथे तुम्हाला ताज्या घडामोडी व बातम्या मिळतील... बातम्या व जाहिरातींसाठी संपर्क - +91 9029198881 करा. आमचे YouTube चॅनेल, Facebook, Telegram ला सबस्क्राईब/ लाईक करा. , गोरेगाव मोहल्ल्यात राष्ट्रवादी पक्षाला मोठा खिंडार – आजचा महाराष्ट्र

गोरेगाव मोहल्ल्यात राष्ट्रवादी पक्षाला मोठा खिंडार

प्रतिनिधी पांडुरंग माने

रायगड (माणगाव) :-मुस्लिम समाज चे माजी उपाध्यक्ष सज्जाद गोडमे सह अनेक सेहकार्यांनी घेतला शिवसेनेत जाहिर प्रवेशआमदार गोगावले यांच्या प्रमुख उपस्थितीत प्रवेश व गोडमे यांची उपशहर अध्यक्षपदी नियुक्तीभरत शेठ गोगावले यांनी कधीही हिंदु मुस्लिम

असा भेद भाव केला नाही ते माणुस म्हणून सर्वांना सहकार्य करत आहेत असा आमदार महाराष्ट्रामध्ये नाही: सज्जादभाई गोडमेमहाड मतदार संघामध्ये गोरेगाव शहरातील गोरेगाव मुस्लिम समाजाचा बऱ्याच वर्षांपासून पूर्णपणे राष्ट्रवादी पक्षाचा वर्चस्व होता व गोरेगाव मुस्लिम समाजाचा राष्ट्रवादी पक्षाला पूर्ण पणे पाठिंबा होता त्यामुळे गोरेगाव शहर व परिसरात गोरेगाव मोहल्ला हा राष्ट्रवादी पक्षाचा बालेकिल्ला समजला जात होता. मात्र रविवारी १२ वाजता च्या

सुमारास शिवसेना उपनेते व आमदार भरत शेठ गोगावले यांच्या प्रमुख उपस्थितीत गोरेगाव चे माजी मुस्लिम समाज उपाध्यक्ष सज्जाद गोडमे सह अनेक महिला व पुरुष सहकार्यानी शिसेनेत जाहीर प्रवेश घेतला. यावेळी सज्जाद गोडमे म्हणाले कि आमदार गोगावले यांनी कुठल्याही प्रकारचे जातीय भेदभाव नाही करता सदैव माणुसकीसाठी कार्य करत आहेत गोरगरीब जनतेच्या मदतीला सदैव उभे राहत आहेत, आ. गोगावले यांच्या सारखे महाराष्ट्राच्या राजनीतीमध्ये आमदार नाही, आम्ही आमदार गोगावले यांच्या कार्यपद्धती वर विश्वास ठेवून प्रवेश करत आहोत व सदैव आमदार गोगावले यांच्या समर्थनात राहू असी वचनबद्धी जाहीर केली, गोडमे यांनी चोळई येथे अपघातात गोरेगाव व परिसरातील मुस्लिम समाजातील मृत्यू व्यक्तींच्या नातेवाईकांना मदत पोहचवण्यासाठी आमदार गोगावले यांच्या सफल पर्यतनाचे ही आवर्जून उल्लेख केले. यावेळी सज्जाद गोडमे यांची आमदार गोगावले यांच्या हस्ते शिवसेना गोरेगाव शहर उपाध्यक्षपदी नियुक्ती ही करण्यात आली. या पक्ष प्रवेश कार्यक्रमाच्या वेळी महिला जिल्हाप्रमुख नीलिमा घोसाळकर, युवासेना जिल्हाप्रमुख विपुल उभारे तालुका प्रमुख महेंद्र मानकर, महिला प्रमुख अरुणा वाघमारे,, जिहापरिषद सदस्य अमृता हरवंडकर, गोरेगाव शहर प्रमुख सचिन शिगवण, शरीफ भाई हरगे, व अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते हजर होते. 

सतत महाड मतदार संघातील अनेक ठिकाणी मुस्लिम समाज शिवसेनेमध्ये प्रवेश करत असल्याने विरोधकांची डोकेदुखी झाली असून आगामी निवडणुकात विरोधकांना मोठी कसरत करावी लागेल असे वर्तवण्यात येत आहे.

Whatsapp आयकॉन दाबून ही बातमी शेअर करा 

Advertising Space


मुक्त आणि खऱ्या पत्रकारितेसाठी ती कॉर्पोरेट आणि राजकीय नियंत्रणापासून मुक्त असणे आवश्यक आहे. लोक पुढे येऊन सहकार्य करतील तेव्हाच हे शक्य आहे.

आता दान करा

[responsivevoice_button voice="Hindi Female"]