नमस्कार आमच्या आजचा महाराष्ट्र टॉप टेन मराठी न्यूज चॅनेल मधे आपल स्वागत आहे...येथे तुम्हाला ताज्या घडामोडी व बातम्या मिळतील... बातम्या व जाहिरातींसाठी संपर्क - +91 9029198881 करा. आमचे YouTube चॅनेल, Facebook, Telegram ला सबस्क्राईब/ लाईक करा. , रोह्यात पोलिसांची हुकूमशाही रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या इसमाचा गुन्हा दाखल करण्यास पोलिसांचा नकार – आजचा महाराष्ट्र

रोह्यात पोलिसांची हुकूमशाही रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या इसमाचा गुन्हा दाखल करण्यास पोलिसांचा नकार

पत्रकार समीर बामुगडे

रायगड (रोहा) :- रोहा तालुक्यात रोहा पोलीसात आज १० जुन रोजी धक्कादायक प्रकार घडला असून सहा ते सात  जणांच्या टोळीने सदर इसमास डोके फोडून रक्तबंबाळ केले मात्र पोलीसांनी सदर प्रकरणी साधा गुन्हा ही दाखल करण्यास नकार दिल्याने ग्रामस्थ संतप्त झाले असून जनतेचे रक्षक की भक्षक अशी प्रतिमा पोलिसांची नागरिकांना उमटत आहे

तक्रार घेण्यास टाळाटाळ या घटनेला रोहा पोलीस जबाबदार त्याच्यावर नागरिकांकडून कारवाईची मागणी 

  सविस्तर वृत्त असे की यातील फिर्यादी गजानन अम्बाजी घाटवल  हे  राहणार धामणसई येथील  एका खाजगी मालकाचे कंपाउंडचे काम करीत असताना गावातील सहा ते सात  जनानी ये तू बांधकाम करू नकोस असे खडसावत  लाथा  बुक्क्यांनी व दगड दंडक्याने डोक्यात जबरी मारहाण केले हा प्रकार  एवढा भयानक होता की यातील इसम गजानन घाटवळ  हे रक्ताच्या थारोळ्यात पडले. सदरील घटनास्थळी त्यांच्या नातेवाईकांनी धाव घेत रोहा पोलीस स्टेशन गाठले तेथून ते सरकारी दवाखान्यात हलविण्यात आले मात्र पोलिसांनी जखमी इसमास पाहून देखील त्यांना कुठलेच मायेचे पाझर  फुटले नाही येथील तपास अधिकारी मेंगाळ यांनी सकाळी ११ ते सायंकाळी सात वाजेपर्यंत त्यांना ताटकळत ठेवले कुठलाच गुन्हा दाखल केला नाही व आरोपीस अटक करण्यात आले नाही सदर पोलिसांनी वस्तुस्थिती पाहिली असता गुन्हा दाखल का केला नाही यावर ग्रामस्थ संतप्त झाले असून या प्रकाराने रोहा पोलिसांची प्रतिमा मलिन झाली आहे

Whatsapp आयकॉन दाबून ही बातमी शेअर करा 

Advertising Space


मुक्त आणि खऱ्या पत्रकारितेसाठी ती कॉर्पोरेट आणि राजकीय नियंत्रणापासून मुक्त असणे आवश्यक आहे. लोक पुढे येऊन सहकार्य करतील तेव्हाच हे शक्य आहे.

आता दान करा

[responsivevoice_button voice="Hindi Female"]