नमस्कार आमच्या आजचा महाराष्ट्र टॉप टेन मराठी न्यूज चॅनेल मधे आपल स्वागत आहे...येथे तुम्हाला ताज्या घडामोडी व बातम्या मिळतील... बातम्या व जाहिरातींसाठी संपर्क - +91 9029198881 करा. आमचे YouTube चॅनेल, Facebook, Telegram ला सबस्क्राईब/ लाईक करा. , सुधागड तालुक्यातील नागशेत परिसरात अवैध खैराची तोड – आजचा महाराष्ट्र

सुधागड तालुक्यातील नागशेत परिसरात अवैध खैराची तोड

पत्रकार समीर बामुगडे

खैर माफियांकडे शासनाचे जाणीवपूर्वक दुर्लक्ष, नागशेत गावाच्या डोगरात चालतो खुलेआम गैरप्रकार

अवैध खैर वाहतूक करणारा ट्रक पकडला ग्रामस्थच बनले वनरक्षक

रायगड (सुधागड) :- सुधागड तालुक्यातील नागशेत परिसरात अवैध खैर तोड होत असल्याचे कळताच ग्रामस्थ जागेवर पोहोचले व वृक्षतोड थांबवून खैराच्या लाकडांनी भरलेला ट्रक पकडून वनविभागाचे काम सोपे केले या घटनेतून खैर तस्कर, विकासक व वनविभागाचे मैत्रीपूर्ण संबंध उघड झाल्याची ग्रामस्थामध्ये चचोॅ आहे,

सुधागड तालुका हा पर्यटनस्थळ म्हणून ओळखला जातो व तसेच सरसगड किल्ला सुधागडची खास ओळख परंतू हिच ओळख पुसण्याचा चंग स्थानिक शासकीय अधिकारी व लाकूड माफियांनी बांधलाय की काय ⁉ अशी स्थिती निर्माण झाली आहे, सुधागड तालुक्यातील नागशेत परिसरात अवैध वृक्षतोड चालू असून याकडे वनविभाग, महसूल, तसेच पर्यावरण खाते दुर्लक्ष करीत आहेत,

याच भागात दरवर्षी ऐन, खैर साग, यांसारख्या किमती वृक्षाची तोड होत असून जंगल नामशेष होण्याच्या मार्गावर आहे लाकडाच्या व्यापारातून लाखो रुपयांची उलाढाल होत असून यातून शासनाचा महसूल बुडत आहे यासाठी शासनाची कोणत्याही प्रकाराची परवानगी घेतली जात नसल्याचे वृत्त आहे ग्रामीण भागातून आडमागोॅने दिवसाढवळया व रात्रीच्या वेळीदेखील लाकडांची वाहतूक होत असून याची खबर शासकीय कर्मचारी किवा अधिका-

यांना नाही, यावर कुणीही विश्वास ठेवणार नाही महत्वाचे म्हणजे या मागोॅवरुन लाकूड वाहतूक करणा-या वाहनांची तपासणी पोलीस अथवा वनखात्याकडून होत नसल्याने या लाकूड वाहतूक माफियांकडून संबंधित शासकीय कर्मचारी व अधिकारी खिसे ओले करुन घेत असल्याचा संशय नागरिक व्यक्त करीत आहेत,

Whatsapp आयकॉन दाबून ही बातमी शेअर करा 

Advertising Space


मुक्त आणि खऱ्या पत्रकारितेसाठी ती कॉर्पोरेट आणि राजकीय नियंत्रणापासून मुक्त असणे आवश्यक आहे. लोक पुढे येऊन सहकार्य करतील तेव्हाच हे शक्य आहे.

आता दान करा

[responsivevoice_button voice="Hindi Female"]