नमस्कार आमच्या आजचा महाराष्ट्र टॉप टेन मराठी न्यूज चॅनेल मधे आपल स्वागत आहे...येथे तुम्हाला ताज्या घडामोडी व बातम्या मिळतील... बातम्या व जाहिरातींसाठी संपर्क - +91 9029198881 करा. आमचे YouTube चॅनेल, Facebook, Telegram ला सबस्क्राईब/ लाईक करा. , चिपळूण व खेड येथील बस स्थानक परिसरात पाणी बाटली चढ्या दराने विकली जाते यात नक्की वरदहस्त कोणाचा… – आजचा महाराष्ट्र

चिपळूण व खेड येथील बस स्थानक परिसरात पाणी बाटली चढ्या दराने विकली जाते यात नक्की वरदहस्त कोणाचा…

पत्रकार राजेंद्र दळवी

रत्नागिरी (खेड) :- सध्या रत्नागिरी जिल्ह्यामध्ये अनेक बस स्थानकावर नाथजल या नावाने पाणी बाटली विक्री होते. राज्य सरकार ना नफा ना तोटा या धोरणानुसार प्रत्येक बस स्थानकवर कंत्राट देतात प्रत्येक तालुक्यातील अनेक लोकांनी हे कंत्राट घेतले आहे चिपळूण मध्ये मात्र हा शासनाने नेमून दिलेल्या किंमती ला याची विक्री होताना दिसत नाही. बस स्थानकावर ठेकेदाराला शासनाच्या नियमा प्रमाणे जागा दिली जाते. त्या जागेवर त्यांनी

लाकडी ठोकळा उभारून नाथजल या कंपनीने दिलेले पाण्याची सील केलेली बाटली विक्री करायची आहे. १ लिटर ची बाटली १५/- असा बाहेर बोर्ड लाऊन या बॉटल्सची विक्री करायची आहे. मात्र अनेक ठिकाणी पोट ठेकेदार ठेवून बस स्थानकावर हि दुकाने उभी आहेत.

चिपळूण बस स्थानकावर नाथजल या दुकानामध्ये अनेकवेळा ५/- रू जादा घेतल्यावरून तू..तू..मे..मे.. होते. तसेच खेड येथील उपहार गृहात २०/- बाटली विक्री केल्यामुळे ग्राहक व दुकानदार यांच्यात अनेक वेळा भांडण होताना दिस मात्र हे ठेकेदार १५/- रू ची किंमत असताना २०/रू – प्रमाणे का विकतात सदर ठिकाणी नक्की कोणाच्या आशिर्वादाने ग्राहकांची ते लुट केली जाते . ना नफा ना तोटा या तत्वावर अनेक ठिकाणी विक्री होत नाही. याचे मुर्तीवंत उदाहरण म्हणजे सोशल मिडीयावर एका महिला-ठेकेदाराची नाथजल विक्रीवरून झालेल्या भांडणाचा व्हिडिओ चांगलाच व्हायरल झाला होता, असे प्रकार खेड तसेच चिपळूण अशा अनेक ठिकाणी होताना दिसतात त्यावेळी बसचे अधिकारी आपल्या डोळ्यावर पट्टी असल्यासारखे वागतात या संदर्भात रत्नागिरी आगार प्रमुख यांच्याजवळ संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता त्यांच्याशी संपर्क होऊ शकला नाही मात्र एसटी प्रशासनाने ठेकेदारांना समज देऊन नाथजल पाणीबॉटल वरील छापील किंतीलाच विक्री झाली पाहिजे यासाठी प्रयत्न करावेत व प्रवाश्यांना दिलासा द्यावा अशी मागणी प्रवासी वर्गातून होत आहे.

Whatsapp आयकॉन दाबून ही बातमी शेअर करा 

Advertising Space


मुक्त आणि खऱ्या पत्रकारितेसाठी ती कॉर्पोरेट आणि राजकीय नियंत्रणापासून मुक्त असणे आवश्यक आहे. लोक पुढे येऊन सहकार्य करतील तेव्हाच हे शक्य आहे.

आता दान करा

[responsivevoice_button voice="Hindi Female"]