महावितरणच्या विरोधात गावक-यांचे रास्तारोको आंदोलन

जालना (भोकरदन) :- दिनांक १८/५/२०२३ जालना जिल्ह्यातील भोकरदन तालुक्यात पिंपळगाव रेणुकाई येथील वारंवार जाळणाऱ्या डि.पी .(रोहिञ)ची दुरुस्ती करण्यात येत नाही म्हणून गावकऱ्यांच्या वतीने महावितरणच्या विरोधात रस्ता रोको आंदोलन केले या रस्ता रोको आंदोलनात गावातील सर्व पक्षाचे नागरिक सहभागी झाले होते गेल्या वर्षभरापासून पिंपळगाव रेणुकाई गावाला विद्युत पुरवठा
करणाऱ्या रोहिञांमध्ये वारंवार बिघाड होत असून नेहमी गावातील रोहिञ जळलेल्या अवस्थेत असतात. त्यामुळे अर्ध्या गावाला सतत अंधारात राहण्याची परंपराच कायम झाली असून याविरुद्ध गावातील नागरिक वारंवार महावितरण कार्यालयात मागणी करूनही महावितरण कार्यालय कधी जळालेले रोहिञ परत पाठवते तर कधी खोटे आश्वासन देऊन नागरिकांना वाटी लावते, त्यामुळे गावात सतत अंधाराचे साम्राज्य असते गावातील गिरण्या बंद असतात पिंपळगाव रेणुकाई एक मोठी बाजारपेठ असून या ठिकाणी विविध बँका विविध पतसंस्था व इतर कॉम्प्युटरवर अवलंबित धंदे आहेत विविध दवाखाने कृषी सेवा केंद्र व इतर अनेक ऑनलाईन प्रकारचे व्यवसाय या ठिकाणी मोठ्या प्रमाणात आहेत हे सर्व व्यवसाय लाईट नसले तर बंद अवस्थेत असतात .सध्या तापमान जवळपास ४१ डिग्रीच्या आसपास आहे व रात्रंदिवस लाईट बंद असल्यामुळे घरात थांबणे सुद्धा मुश्किल झाले आहे ,लाईट बंद असल्यामुळे कुलर टीव्ही पंखे सगळेच बंद असतात व रात्रीच्या वेळी मच्छरांना मेजवानी द्यावी लागते अशा अवस्थेत नागरिकांना नेहमीच रात्री रात्री जागून काढाव्या लागत असल्यामुळे महावितरणच्या विरोधात नागरिकांचा तीव्र संताप प होत होता याच पार्श्वभूमीवर ग्रामपंचायत कार्यालयाच्या वतीने १८ मे रोजी आंदोलन व आत्मदहनाचा इशारा दिल्यानंतर महावितरणच्या कर्मचाऱ्यांनी दोन रोहिञ जागेवर आणून दिले असल्याने हे आंदोलन मागे घेण्यात आले व उर्वरित रोहिञ आठ दिवसाच्या आत देण्यात येईल या लेखी आश्वासनानंतर पारध ते भोकरदन या रस्त्यावर अर्धा तास रस्ता रोको करण्यात आला होता आंदोलना वेळी लेखी दिल्यानंतर आंदोलन मागे घेण्यात आले यावेळी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक अभिजीत मोरे महावितरण कंपनीचे कनिष्ठ अभियंता प्रदीप गावंडे , सातदिवे, मयूर गुलगे यांच्यासह इतर कर्मचारी उपस्थित होते. यावेळी संदीप देशमुख, रमेश आहेर, राधाकिसन भोसले, निवृत्ती गावंडे, समाधान तायडे, अमोल नरवाडे, पंडित नरवाडे, गणेश देशमुख यांच्या सह इतरही नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
|
Whatsapp आयकॉन दाबून ही बातमी शेअर करा |
Advertising Space













