नमस्कार आमच्या आजचा महाराष्ट्र टॉप टेन मराठी न्यूज चॅनेल मधे आपल स्वागत आहे...येथे तुम्हाला ताज्या घडामोडी व बातम्या मिळतील... बातम्या व जाहिरातींसाठी संपर्क - +91 9029198881 करा. आमचे YouTube चॅनेल, Facebook, Telegram ला सबस्क्राईब/ लाईक करा. , सुधागड तालुका मराठा समाज अध्यक्षपदी धनंजय साजेकर यांची सर्वसाधारण सभेत निवड – आजचा महाराष्ट्र

सुधागड तालुका मराठा समाज अध्यक्षपदी धनंजय साजेकर यांची सर्वसाधारण सभेत निवड

प्रतिनिधि सुधागड 

रायगड (सुधागड) :- सुधागड तालुका मराठा समाजाची दिनांक ६ मे रोजी पाली येथे मराठा समाज भवन- स्व.सटूराम सखाराम साजेकर सभागृहात सर्व साधारण सभा पार पडली. यावेळी सुधागड तालुक्यातील समस्त मराठा बंधू भगिनी सर्वसाधारण सभेसाठी मोठ्या संख्येने उपस्थित होते. या सर्वसाधारण सभेमध्ये सर्वानुमते सुधागड तालुका मराठा समाज अध्यक्षपदी धनंजय साजेकर याची निवड करण्यात आली.

     या सभेच्या सुरुवातीस उपस्थित मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन करण्यात आले. तसेच छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करण्यात आला. 

     

या सभेच्या सुरुवातीस सभेची प्रस्तावना दामोदर ठाकूर सर यांनी केली. प्रस्तावनेमध्ये सर्वसाधारण सभेचे आयोजन का करण्यात आले आहे थोडक्यात माहिती दिली. त्यानंतर सुधागड तालुका मराठा समाजाचे सरचिटणीस जीवन साजेकर यांनी मागील सभेचे इतिवृत्त, जमाखर्च, नवीन ठराव सभेमध्ये उपस्थितांना वाचून दाखविला. त्यानंतर मराठा समाजाचे माजी अध्यक्ष गणपत सीतापराव यांच्या बद्दल ऋणनिर्देशन ठराव निंबाळकर सर यांनी सर्वसाधारण सभेत मांडला. यावेळी माजी अध्यक्ष यांचे स्वागत शाल, श्रीफळ, पुष्पगुच्छ देऊन नवीन अध्यक्ष धनंजय साजेकर तसेच उपस्थित संचालक यांनी केले.

     तसेच त्यानंतर नवीन संचालक म्हणून ॲड. नितीन शेवाळे, सी.ए. अरविंद दंत, मध्यवर्ती कार्यकारणी ५ महिला संचालक म्हणून समृद्धीताई यादव, निहारिकाताई शिर्के, साक्षीताई दिघे, दिपालीताई बेलोसे व स्नेहाताई भोईर या पाच महिलांची निवड करण्यात आली.

यानंतर माजी अध्यक्ष गणपत सीतापराव यांनी आपल्या कार्य काळातील केलेल्या अनेक कार्यांचा उजळा आपल्या मनोगतातून व्यक्त केला. यानंतर ॲड. नितीन शेवाळे यांनी आपले मनोगत व्यक्त करत धनंजय साजेकर हे एक कप्तान प्रमाणे मराठी मराठा समाजाचे नेतृत्व करतील आणि सगळ्यांना बरोबर घेऊन समाजाच्या विकासासाठी अनेक चांगले कार्य करतील असे आपल्या मनोगतातून व्यक्त केले.

यानंतर समाजाच्या सर्व विभागातर्फे विभागीय अध्यक्ष व समाज बंधू भगिनिंनी नवीन अध्यक्ष तसेच संचालक मंडळ यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले. या सभेच्या शेवटी नवीन अध्यक्ष धनंजय साजेकर यांनी आपले अध्यक्षीय भाषणातून आपले विचार मांडले. यामध्ये बाल संस्कार केंद्र, रक्तदान शिबिर महिलांसाठी आरोग्य तपासणी शिबिर, तसेच महिलांच्या उन्नती व विकासासाठी पतपेढी निर्माण करणे, विविध क्षेत्रातील खेळाडू यांच्यासाठी मार्गदर्शन व प्रशिक्षण याची सोयी सुविधा उपलब्ध करणे, आर्थिक परिस्थितीमुळे शिक्षण घेऊ शकत नसलेल्या विद्यार्थीसाठी अर्थसहाय्य देणे, मराठा समाजातील तरुण-तरुणींसाठी उच्च शिक्षणासाठी मार्गदर्शन शिबिरे यू.पी.एससी एम.पी.एससी अभ्यासक्रमाचे मार्गदर्शन व शिबिरे घेणे, तरुण-तरुणी, महिला, बेरोजगार व्यक्ती यांच्यासाठी विकास कौशल्य या मार्गदर्शन शिबिरांच्या आयोजन, तालुक्यातील मराठा समाज बांधवांची जनगणना करण्यासाठी गुगल फ्रॉम तयार करण्यात आला असून याद्वारे मराठा समाज बांधवांची लवकरच जनगणना केली जाईल, तसेच लवकर मराठा सामजाची वेब साईट व मासिक प्रकाशित केले जाईल असे त्यांनी यावेळी सांगितले.

धनंजय साजेकर यांची सुधागड तालुका मराठा समाज अध्यक्ष पदी निवडीमुळे मराठा समाजातील महिला वर्ग पुरुष वर्ग, तरुण वर्ग यांच्यामध्ये नवचैतन्याचे वातावरण झाले आहे. भविष्यात सुधागड तालुका मराठा समाज बांधवांच्या प्रगतीसाठी, उन्नतीसाठी धनंजय साजेकर यांच्याकडून नक्कीच मोलाचे असे कार्य होईल अशी आशा सर्व मराठा समाज बांधवांकडून यावेळी व्यक्त केली गेली.

   या सभेचे सूत्रसंचालन दामोदर ठाकूर सर यांनी केले. सुदाम मेणे गुरुजी यांनी अध्यक्ष यांच्या परवानगीने उपस्थित सर्वांंचे आभार मानून सभेची सांगता केली.

Whatsapp आयकॉन दाबून ही बातमी शेअर करा 

Advertising Space


मुक्त आणि खऱ्या पत्रकारितेसाठी ती कॉर्पोरेट आणि राजकीय नियंत्रणापासून मुक्त असणे आवश्यक आहे. लोक पुढे येऊन सहकार्य करतील तेव्हाच हे शक्य आहे.

आता दान करा

[responsivevoice_button voice="Hindi Female"]