आ.भरतशेट गोगावले यांच्या हस्ते पोलादपूर आपघातात मृत्युमुखी पडलेल्या प्रत्येक व्यक्तीच्या नातेवाईकांना ५ लाखाचे धनादेश सुपूर्द
प्रतिनिधि पांडुरंग माने
आ.गोगावले यांच्याकडून वचनपूर्ततेचे पीडित नातेवाईकांनी मानले आभार.
रायगड (माणगाव) :- सात नोव्हेंबर २०२२ रोजी खेड येथे डी एड परिक्षा देऊन घरी परतताना गोरेगाव , नांदवी व पालदपूर सवाद वावे येथील तीन विद्यार्थिनी हलीमा अ.सलाम पोपेरे , आलिया बहुर , नाजनीन करबेलकर या तीन विद्यार्थिनी व गोरेगाव येथील रिक्षा चालक अमान बहुर यांच्या रिक्षावर कशेडी घाटाच्या पायथेशी चोळई गावच्या हद्दीत खेड कडून पोलादपूर च्या दिशेने रेतीने भरलेला
अनियंत्रित भरधाव डंपर रिक्षावर उलटल्याने रेतीच्या ढिगाऱ्या खाली अडकून रिक्षा मधील ३ विद्यार्थीनी व चालक एकूण चार जणांचा जागीस मृत्यू झाला होता. या दुर्दैवी घटनेची दखल घेत राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून प्रत्येकी मृत व्यक्तींच्या कुटुंबांना पाच लाख रुपये मदतीची घोषणा करण्यात आली होती सदरील मदत मिळण्यास विलंब झाल्यामुळे निर्माण प्रश्नांचे प्रसार माध्यमातून उत्तर देत आमदार गोगावले यांच्याकडून पीडित कुटुंबांना लवकरच मदत देण्यात येईल व त्यासाठी आमदार स्वतःत प्रयत्नशील आहेत असे खंबीर आश्वासन देण्यात आले होते व आज ९ मे रोजी आमदारांनी आपल्या वचत बद्धी वर शिक्का मोर्तब करत चार ही मृत व्यक्तींच्या कुटुंबांकडे प्रत्येकी ५ लाख रुपयाचे धनादेश सुपूर्द केले त्यामुळे मदत पोहचण्यासाठी विलंब झाल्यामुळे निर्माण प्रश्न व टिकाना तसेच पीडित कुटुंबांच्या मदतीच्या प्रतिक्षेला पूर्ण विराम मिळाले असून , पीडित कुटुंबांच्या नातेवाईकांकडून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व आमदार भरत शेठ गोगावले यांचे आभार व्यक्त करण्यात आले आहेत.
|
Whatsapp आयकॉन दाबून ही बातमी शेअर करा |
Advertising Space













