नमस्कार आमच्या आजचा महाराष्ट्र टॉप टेन मराठी न्यूज चॅनेल मधे आपल स्वागत आहे...येथे तुम्हाला ताज्या घडामोडी व बातम्या मिळतील... बातम्या व जाहिरातींसाठी संपर्क - +91 9029198881 करा. आमचे YouTube चॅनेल, Facebook, Telegram ला सबस्क्राईब/ लाईक करा. , प्रश्न जिथे जनतेचा मार्ग तिथे मनसेचा – आजचा महाराष्ट्र

प्रश्न जिथे जनतेचा मार्ग तिथे मनसेचा

प्रतिनीधी कर्जत 

नेरळ प्राथमिक आरोग्य केंद्राला महाराष्ट्र नवनिर्माण महिला सेनेच्या कर्जत तालुका अध्यक्षा सौ.आकांक्षा शर्मा – सावंत, व नेरळ शहर अध्यक्षा सौ.तेजश्री भोईर यांनी दिली धडक.

रायगड (कर्जत) :- मनसे अध्यक्ष सन्मा.श्री.राजसाहेब ठाकरे व मनसे नेते सन्मा.श्री.अमित साहेब ठाकरे यांच्या आदेशाने व मनसे महिला सेना सरचिटणीस व कोकण संपर्क प्रमुख सौ.स्नेहल ताई जाधव,मनसे रायगड जिल्हा अध्यक्ष श्री.जितेंद्र दादा पाटील,मनसे महिला सेना रायगड जिल्हा अध्यक्ष सौ.सपना ताई राऊत – पाटील,कर्जत तालुका अध्यक्ष श्री.महेंद्र दादा निगुडकर,यांच्या मार्गदर्शनाने मनसे कर्जत तालुका अध्यक्षा सौ.आकांक्षा ताई शर्मा-सावंत ,नेरळ शहर अध्यक्ष सौ.तेजश्री ताई भोईर यांनी प्राथमिक

आरोग्य केंद्र नेरळ येथे धडक देत रुग्णांना व महिलांना प्रसूती दरम्यान उद्भवणाऱ्या समस्येसाठी जाब विचारला व लवकरात लवकर प्रश्न मार्गी लावावा अन्यथा मनसे स्टाईलने आंदोलन छेडण्यात येईल अश्या आशयाचे निवेदन दिले.व त्याची सर्वस्वी जबाबदारी आपली व आपल्या प्रशासनाची असेल असे ठणकावले.त्याप्रसंगी तात्काळ तालुका आरोग्य अधिकारी डॉ.मोरे यांनी मनसे तालुका अध्यक्षा सौ.आकांक्षा ताई शर्मा – सावंत,यांच्याशी फोनवरून संपर्क करत आश्वासन दिले की येत्या ११ एप्रिल २०२३ पर्यंत प्राथमिक आरोग्य केंद्रात टी.डी.चे इंजेक्शन उपलब्ध करून देण्यात येतील.आरोग्य केंद्रातील गिझर गेले ५ महिन्यापासून नादुरुस्त असल्याने गरोदर मातांना गरम पाण्याची समस्या उद्भवत होती तोही दुरुस्त करून घेण्यात येईल.इतर समस्या लवकरात लवकर मार्गी लावण्यात येतील.यावर सविस्तर चर्चा झाली.त्याप्रसंगी उपस्थित मनसे महिला आघाडी कर्जत तालुका अध्यक्षा सौ.आकांक्षा ताई शर्मा – सावंत,मनसे महिला आघाडी नेरळ शहर अध्यक्षा सौ.तेजश्री ताई भोईर,मनसे नेरळ शहर उपाध्यक्ष श्री.सागर भोईर व महाराष्ट्र सैनिक आणि ग्रामस्थ उपस्थित होते.

Whatsapp आयकॉन दाबून ही बातमी शेअर करा 

Advertising Space


मुक्त आणि खऱ्या पत्रकारितेसाठी ती कॉर्पोरेट आणि राजकीय नियंत्रणापासून मुक्त असणे आवश्यक आहे. लोक पुढे येऊन सहकार्य करतील तेव्हाच हे शक्य आहे.

आता दान करा

[responsivevoice_button voice="Hindi Female"]