खेड तालुका कब्बड्डी असोसिएशनची वार्षिक सर्वसाधारण सभा संपन्न

रत्नागिरी (खेड) :- खेड तालुका कब्बड्डी असोसिएशनची वार्षिक सर्वसाधारण सभा नवभारत हायस्कूल भरणे येथे खेड तालुका कब्बड्डी असोसिएशनचे अध्यक्ष श्री. सतीश उर्फ पप्पूशेठ चिकणे यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली.तालुका सचिव श्री. रविंद्र बैकर सर यांनी वार्षिक सर्वसाधारण सभेच्या नोटीसचे वाचन केले. यानंतर कब्बड्डी परिवाराशी संबंधित व ज्ञात अज्ञात मयत व्यक्तींना सभागृहातील उपस्थितांच्या वतीने श्रद्धांजली वाहण्यात आली.
सचिव यांनी गतवर्षी झालेल्या दिनांक ३० जानेवारी२०२२ रोजीच्या वार्षिक सर्वसाधारण सभेच्या इतिवृत्ताचे वाचन केले. या इतिवृत्तावर सभागृहात चर्चा होऊन सदर इतिवृत्त सर्वानुमते मंजूर करण्यात आले. यानंतर गतवर्षातील कब्बड्डीशी संबंधित उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या, गौरवास्पद यश मिळवणाऱ्या, विशेष निवड झालेल्या, राज्य पंच परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या सर्वांच्या अभिनंदनचे ठराव सभागृहातून मांडण्यात आले त्याला सर्वानुमते मंजुरी देण्यात आली.

सन -२०२१/२२ मध्ये झालेल्या वार्षिक जमा-खर्चाचे वाचन सचिवांनी केले.त्यावर चर्चा होऊन सदर जमा-खर्चास सर्वानुमते मंजुरी देण्यात आली. यानंतर सन २०२३/२४ चे अंदाजपत्रक सादर केले त्यावरही सभागृहात चर्चा झाली.
यानंतर अध्यक्षांच्या परवानगीने येणाऱ्या आयत्या वेळेला विषयामध्ये यापुढे कब्बड्डी कार्यकारणी सभेची निमंत्रणे, कार्यकारणीशी संबंधित पदाधिकाऱ्यांशी, नोंदणीकृत संघाचे व्यवस्थापक यांच्याशी करावयाचा पत्रव्यवहार, स्पर्धा आयोजन, जिल्हा तालुका स्तरावर होणाऱ्या विविध निवड चाचणी स्पर्धा, पंच नेमणुका, विविध स्पर्धांची कब्बड्डीशी संबंधित कार्यक्रमाची निमंत्रणे, माहिती व्हाट्सअपच्या माध्यमातून पेपरलेस पद्धतीने देण्यात येईल. ती अधिकृत मानून त्या पद्धतीने असोसिएशनचे सर्व पदाधिकारी व संबंधित आयोजक यांनी कार्यवाही कारणेबाबत महत्वपूर्ण ठराव करण्यात आला. तसेच स्पर्धा आयोजनात होणाऱ्या त्रुटी, त्यावर असोशियन व आयोजकांनी करावयाची कार्यवाही, कब्बड्डी वाढीसाठी अधिक स्पर्धांचे नियोजन, स्पर्धा घेणाऱ्या आयोजकांना सर्वतोपरी सहकार्य, पंचांची नेमणूक, पंचांनी करावयाचे सहकार्य, स्पर्धेची वेळ ग्रामीण भागातील कब्बड्डी वाचण्या वाढविण्यासाठी द्यावयाची योगदान, कब्बड्डीची बदललेली नियमावली, राज्य जिल्हा कब्बड्डी असोसिएशन कडून होणारे वेगवेगळे बदल अशा विविध विषयांवर महत्वपूर्ण चर्चा होऊन काही ठराव करण्यात आले.
शेवटी तालुकाध्यक्ष श्री पप्पूशेठ यांच्या अध्यक्षीय भाषणात खेड तालुक्यातील कब्बड्डी वाढवणे ही सर्वांची सामूहिक जबाबदारी असून त्यासाठी सगळ्यांनी सर्वतोपरी सहकार्य करण्याचे आवाहन करत गतवर्षात केलेल्या महत्त्वपूर्ण सहकार्याबद्दल सर्वांना धन्यवाद देत कब्बड्डीसाठी एकतेने प्रयत्न करण्याचे आवाहन केले.
यावेळी कुणबी शिक्षण संस्था संचालक श्री.राजाभाऊ बैकर,ज्येष्ठ राष्ट्रीय पंच, मार्गदर्शक श्री.आत्माराम उर्फ दादा बैकर, उपाध्यक्ष श्री.महेशराव भोसले, श्री.आनंद उर्फ भाई हंबीर, माजी अध्यक्ष श्री. शरद सुर्वे, कोषाध्यक्ष श्री.दाजी राजगुरू, सहसचिव श्री.शरद भोसले, कार्यकारणी सदस्य श्री. दिलीप कारेकर, श्री.दिपक यादव, श्री.सु.रा.पवार, श्री.स्वप्निलशेठ सैतवडेकर, श्री.अमोल दळवी, श्री.सुभाष आंबेडे, श्री.संतोष शिर्के, श्री.शंकर पार्टे, श्री. महेश मर्चंडे, श्री.तुषार सापटे, श्री.संजय जाधव, श्री.सुजित फागे, श्री.मधुकर शिंदे, सौ.संपदा गुजराथी यांचे सह अन्य मान्यवर संघ प्रतिनिधी, सभासद उपस्थित होते.सहसचिव श्री.शरद भोसले यांनी सर्वांचे आभार मानत वार्षिक सर्वसाधारण सभा संपन्न झाल्याचे अध्यक्षांच्या वतीने जाहीर केले.
|
Whatsapp आयकॉन दाबून ही बातमी शेअर करा |
Advertising Space













