नमस्कार आमच्या आजचा महाराष्ट्र टॉप टेन मराठी न्यूज चॅनेल मधे आपल स्वागत आहे...येथे तुम्हाला ताज्या घडामोडी व बातम्या मिळतील... बातम्या व जाहिरातींसाठी संपर्क - +91 9029198881 करा. आमचे YouTube चॅनेल, Facebook, Telegram ला सबस्क्राईब/ लाईक करा. , दहावी,बारावी नंतर काय..? करियर व उच्च शिक्षण मार्गदर्शन शिबिर – आजचा महाराष्ट्र 504 Gateway Time-out

504 Gateway Time-out


nginx

दहावी,बारावी नंतर काय..? करियर व उच्च शिक्षण मार्गदर्शन शिबिर

प्रतिनिधी पांडुरंग माने 

रायगड (माणगाव) :- इयत्ता दहावी व बारावी नंतरच्या पारंपारिक अभ्यासक्रमाबरोबर अनेक नवीन अभ्यासक्रम सुरु झालेले आहेत. विद्यार्थ्यांचे भवितव्य घडविणाऱ्या विविध प्रकारच्या नवीन अभ्यासक्रमाची माहिती विद्यार्थी आणि पालकांना पुरेशी नसते. त्यामुळे या अभ्यासक्रमाबाबत विद्यार्थी पालकांचा गोंधळ होत असतो. या गोंधळामुळे विद्यार्थ्यांची क्षमता असूनही त्यांना चांगल्या अभ्यासक्रमाच्या माध्यमातून करीअर करण्याची संधी मिळू शकत नाही.विद्यार्थ्यांना या संधीचा लाभ घेता यावा या उद्देशाने श्री रोहित दादा पारधे(महाड विधानसभा समन्वयक) युवासेना उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे यांनी रविवार दि. ०९-०४-२०२३ रोजी वेळ सकाळी ११:०० ते सायं ४:०० वाजे पर्यंत ह्या वेळेत कुणबी भवन हॉल,निजामपूर रोड,माणगाव रायगड येथे करीअर मार्गदर्शन शिबीर आयोजित केले आहे.

या शिबिरास श्री.मनोज सानप(रायगड जिल्हा माहिती अधिकारी अलिबाग-रायगड),श्री.सुहास पाटील(करीयर मार्गदर्शन लेखक दै.लोकसत्ता), श्री.राजेंद्र पाटील (पोलीस निरीक्षक माणगाव पोलिस ठाणे),श्री.प्रभाकर नाईक (सरचिटणीस राज्य सरकारी संघटना) ह्या तज्ञ व अनुभवी व्यक्ती मार्गदर्शन करणार आहे.त्या शिवाय पालक व विद्यार्थ्यांच्या शंकांचे समाधान यावेळी करण्यात येणार आहे.

 तरी विद्यार्थी,पालक आणि शिक्षकांनी आपल्या पाल्याचे भविष्य उज्वल करण्यासाठी या करियर मार्गदर्शक शिबिरास उपस्थित राहून संधीचा लाभ घ्यावा अशी विनंती त्यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना केली आहे.

Whatsapp आयकॉन दाबून ही बातमी शेअर करा 

Advertising Space


मुक्त आणि खऱ्या पत्रकारितेसाठी ती कॉर्पोरेट आणि राजकीय नियंत्रणापासून मुक्त असणे आवश्यक आहे. लोक पुढे येऊन सहकार्य करतील तेव्हाच हे शक्य आहे.

आता दान करा

[responsivevoice_button voice="Hindi Female"]