नमस्कार आमच्या आजचा महाराष्ट्र टॉप टेन मराठी न्यूज चॅनेल मधे आपल स्वागत आहे...येथे तुम्हाला ताज्या घडामोडी व बातम्या मिळतील... बातम्या व जाहिरातींसाठी संपर्क - +91 9029198881 करा. आमचे YouTube चॅनेल, Facebook, Telegram ला सबस्क्राईब/ लाईक करा. , गोरेगाव श्री भैरवनाथ यात्रात्सोव अध्यक्ष पदी भारत गोरेगावकर यांची बिनविरोध निवड ; ०४ एप्रिल२०२३ रोजी भरणार जत्रा – आजचा महाराष्ट्र

गोरेगाव श्री भैरवनाथ यात्रात्सोव अध्यक्ष पदी भारत गोरेगावकर यांची बिनविरोध निवड ; ०४ एप्रिल२०२३ रोजी भरणार जत्रा

प्रतिनीधी पांडुरंग माने

रायगड (माणगाव) :- दक्षिण रायगड जिल्‍हयात संपन्न होणाऱ्या यात्रांपैकी ऐतिहासिक महत्त्व व सर्व धर्मीय समभावाचे प्रतिक म्हणून ओळख असलेल्या गोरेगाव येथील श्री भैरवनाथ महाराज यात्रात्सोवाच्या अध्यक्ष पदी पत्रकार भारत गोरेगावकर यांची संपूर्ण गावांनी बिनविरोध निवड केली असून यावर्षी तिथीनुसार मंगळवार दिनांक ०४ एप्रिल २०२३ रोजी हि यात्रा संपन्न होणार आहे.

माणगाव तालुक्‍यातील गोरेगाव या नगरीचे ग्रामदैवत अशी ओळख असलेल्या श्री भैरवनाथ महाराज यात्रेला इतिहास काळापासून अनन्यसाधारण महत्व आहे. उंच बगाडावर फिरणारी लाट हे मुख्य आकर्षण असले तरीही या उत्सवात हिंदु मुस्लिम ऐक्याची परंपरा आहे. पूर्वेकडील जंगलातून वतनदार मंडळीं कडून २६ हात लांबीचे लाकूड खांद्यावरती उचलून वाजत गाजत गावात आणले जाते याच लाकडाला लाट असे संबोधले जाते.भैरवनाथ मंदिरा समोरील उंच बगाडावर हि लाट चढविली जाते मात्र त्यापूर्वी मानाची पालखी मधून पिर बाबा ला हाक मारून या उत्सवासाठी आणले जाते आणि संध्याकाळी सुर्यास्ता पूर्वी वतनदार मानकरी हि लाट फिरवता हा क्षण डोळ्यात साठवून ठेवण्या करिता राज्याच्या कानाकोपऱ्यातून हजारो भाविकांची गर्दी पहायला मिळते विशेष म्हणजे मुंबई, पुणे,ठाणे सह राज्याच्या इतर भागात असणारे भाविक, चाकरमानी या यात्रेसाठी आवर्जून उपस्थित राहतात यंदा लाट सोमवार दि .०३ एप्रिल२०२३ रोजी मांघरूळ गावातून आणण्यात येणार असून मंगळवार दि. ४ एप्रिल२०२३ रोजी यात्रात्सोव संपन्न होणार आहे मानाच्या पालख्या आणि काठ्या हि परंपरा देखील जपली जाते.

या यात्रात्सोवाच्या पार्श्वभूमीवर वतनदार मंडळी, देवस्थान ट्रस्ट तसेच ग्रामस्थांनी विनायक महाडिक यांच्या अध्यक्षतेखाली घेतलेल्या महत्त्वपूर्ण बैठकीत यात्रा उत्सवाचे नियोजन करण्यात आले भाविकांची होणारी गर्दी लक्षात घेता गैरसोय होणार नाही यावरती उपाय योजना करण्यात आल्या तसेच यावर्षीची यात्रात्सोव समिती नेमण्यात आली अध्यक्ष पदी पत्रकार भारत गोरेगावकर यांची सर्वानुमते बिनविरोध निवड करण्यात आली तर कार्यकारणी सदस्य म्हणून किशोर तटकरे, अशोक आंबेतकर,उमेश लाड,संजय पोवळे, संतोष महाडीक,निलेश महाले,विशाल भुस्कुटे, आशितोष महाले,रूपेश पितळे,अभिजित महाले,सचिन गोरेगावकर यांची निवड करण्यात आली  या बैठकीसाठी सुरेश लाड,दादा महाले, दिलीप गोरेगावकर, आबा पोवळे,गणेश यादव,किरण तांबडे,नाना महाले,हरेश शेठ,गणेश गोरेगावकर, दिलीप भिसे,राकेश पोवळे ,प्रसाद गोरेगावकर आदी उपस्थित होते.

या यात्रेत कुरवडे येथील मानाची काठी एकादशीला येते,यानंतर भैरवनाथ महाराजांची बहिण सोमजाई देवीची पालखी व काठी तसेच मानाची काठी अशी ओळख असलेली भिन्नाड गावची काठी हे भाविकांचे खास आकर्षण असते.

Whatsapp आयकॉन दाबून ही बातमी शेअर करा 

Advertising Space


मुक्त आणि खऱ्या पत्रकारितेसाठी ती कॉर्पोरेट आणि राजकीय नियंत्रणापासून मुक्त असणे आवश्यक आहे. लोक पुढे येऊन सहकार्य करतील तेव्हाच हे शक्य आहे.

आता दान करा

[responsivevoice_button voice="Hindi Female"]