नमस्कार आमच्या आजचा महाराष्ट्र टॉप टेन मराठी न्यूज चॅनेल मधे आपल स्वागत आहे...येथे तुम्हाला ताज्या घडामोडी व बातम्या मिळतील... बातम्या व जाहिरातींसाठी संपर्क - +91 9029198881 करा. आमचे YouTube चॅनेल, Facebook, Telegram ला सबस्क्राईब/ लाईक करा. , दिनांक ३१ मार्च २०२३ रोजी जिल्हा परिषद आदर्श प्राथमिक शाळा दिवाणखवटी गणपती ,केंद्र खवटी ,तालुका खेड, जिल्हा रत्नागिरी या शाळेमध्ये केंद्रस्तरीय शिक्षण परिषद संपन्न झाली. – आजचा महाराष्ट्र

दिनांक ३१ मार्च २०२३ रोजी जिल्हा परिषद आदर्श प्राथमिक शाळा दिवाणखवटी गणपती ,केंद्र खवटी ,तालुका खेड, जिल्हा रत्नागिरी या शाळेमध्ये केंद्रस्तरीय शिक्षण परिषद संपन्न झाली.

पत्रकार राजेंद्र दळवी

रत्नागिरी (खेड):- सदर शिक्षण परिषदेचे सूत्रसंचालन दिवाणखवटी गणपती शाळेचे मुख्याध्यापक श्री .विनोद लष्कर सर यांनी केले .सदर शिक्षण परिषदेच्या अध्यक्षस्थानी माननीय श्री. सुनील दळवी सर (मुख्याध्यापक, शाळा तुळशी बुद्रुक) हे होते .सदर शिक्षण परिषदेमध्ये खवटी नं.१ शाळेचे उपशिक्षक श्री .राजेंद्र क्षीरसागर सर

यांनी सेफ्टी आणि सेक्युरिटी या विषयावर मार्गदर्शन केले तर श्री. मनोहर पेंडखळकर सर यांनी शाळा सिद्धि या विषयावर मार्गदर्शन केले. सदर शिक्षण परिषदेमध्ये जिल्हा परिषद आदर्श प्राथमिक शाळा दिवाणखवटी गणपती या शाळेतील विद्यार्थ्यांचा सत्कारही शिक्षण विस्तार अधिकारी आदरणीय श्री. संतोष भोसले साहेब यांच्या हस्ते करण्यात आला. रत्नागिरी जिल्हा परिषद अंतर्गत

घेण्यात आलेल्या रत्नागिरी टॅलेंट सर्च, आमचा रत्नागिरीचा भास्कराचार्य या जिल्हास्तरीय चाळणी परीक्षेमध्ये विद्यार्थ्यांनी दैदिप्यमान असे यश संपादन केले होते. विद्यार्थ्यांनी सदर परीक्षेमध्ये घवघवीत यश संपादन केल्यामुळे शाळेच्या वतीने आदरणीय संतोषजी भोसले साहेब शिक्षण विस्तार अधिकारी यांच्या हस्ते त्यांचा सत्कार करण्यात आला .सदर सत्कार समारंभानंतर आदरणीय संतोषजी भोसले शिक्षण विस्तार अधिकारी यांनी उपस्थित सर्व शिक्षकांना अनमोल मार्गदर्शन केले. आदरणीय

केंद्रप्रमुख अंकुश उंडे साहेब यांनी सुद्धा उपस्थित सर्व परिषदेतील शिक्षकांना प्रशासकीय कामकाजाविषयी अनमोल मार्गदर्शन केले. यानंतर शिक्षण परिषदेत उपस्थित सर्व शिक्षकांनी भोजनाचा आस्वाद घेतला .सदर कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन श्रीमती संगीता भुसे (उपशिक्षिका) यांनी केले.सदर कार्यक्रमाला आवर्जून भेट देणारे पत्रकार आदरणीय राजेंद्र दळवी यांचाही सत्कार यावेळी करण्यात आला.

Whatsapp आयकॉन दाबून ही बातमी शेअर करा 

Advertising Space


मुक्त आणि खऱ्या पत्रकारितेसाठी ती कॉर्पोरेट आणि राजकीय नियंत्रणापासून मुक्त असणे आवश्यक आहे. लोक पुढे येऊन सहकार्य करतील तेव्हाच हे शक्य आहे.

आता दान करा

[responsivevoice_button voice="Hindi Female"]