बाळसई गावांत चाकू हल्यात एका व्यक्ती चा खून रोहा तालुक्यात घडली धक्कादायक घटना.

रायगड (रोहा) :- सविस्तर घटना अशी कि, बाळसई गावांत राहण्यारा परशुराम पवार हा व्यक्ती गेली कित्येक महिने विनाकारण त्यांच्याच शेजारी राहत असलेल्या दत्ताराम राऊत यांना विनाकारण त्रास देत होता .तो दारू पिऊन घरी येऊन विनाकारण त्रास देत शिवीगाळ करत असे,असंच होळी च्या दिवशी सुद्धा ती व्यक्ती 
दत्ताराम राऊत यांना शिवीगाळ करत होता. परशुराम याने घरामध्ये वापरात असेलेली सूरी आणली व दत्ताराम राऊत यांचावर हल्ला केला, या हल्ल्यामध्ये त्यांचं फुफुस व आतडे यावर मोठी इजा झाली. त्यांना उपचारासाठी सरकारी रुग्णालयामध्ये हलवले, नंतर पेन येथे उपचारासाठी पाठवले असता त्यांची प्रकृती अचानक जास्त बिघडली व त्यातच त्यांचा मृत्यू झाला. सदर गुन्ह्याची नोंद नागोठणे पोलीस स्टेशन येथे झाली असून आरोपीवर भा. द. वि. कलम ३०२, ३०७, ३१० गुन्हा दाखल झाला असून पुढील तपास पोलीस निरीक्षक जगताप साहेब यांच्या नेतृत्वाखाली योग्य दिशेने चालू आहे.
|
Whatsapp आयकॉन दाबून ही बातमी शेअर करा |
Advertising Space













