नमस्कार आमच्या आजचा महाराष्ट्र टॉप टेन मराठी न्यूज चॅनेल मधे आपल स्वागत आहे...येथे तुम्हाला ताज्या घडामोडी व बातम्या मिळतील... बातम्या व जाहिरातींसाठी संपर्क - +91 9029198881 करा. आमचे YouTube चॅनेल, Facebook, Telegram ला सबस्क्राईब/ लाईक करा. , महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त कार्यक्रमांसाठी विशेष परवानगी द्या- आमदार प्रशांत ठाकूर यांची विधिमंडळात मागणी ! – आजचा महाराष्ट्र

महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त कार्यक्रमांसाठी विशेष परवानगी द्या- आमदार प्रशांत ठाकूर यांची विधिमंडळात मागणी !

प्रतिनीधी पनवेल

रायगड (पनवेल) :- भारतीय राज्य घटनेचे शिल्पकार महामानव भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त आयोजित करण्यात येणाऱ्या सामाजिक, शैक्षणिक कार्यक्रमांच्या अनुषंगाने राज्यात दिनांक १४ ते १६ एप्रिल रात्री १२ वाजेपर्यंत कार्यक्रम आयोजित करण्यासाठी शासनाने विशेष परवानगी द्यावी, अशी मागणी आमदार प्रशांत ठाकूर यांनी विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात औचित्याच्या मुद्याद्वारे शासनाकडे केली.

आमदार प्रशांत ठाकूर यांनी सभागृहात औचित्याचा मुद्दा मांडताना म्हंटले कि, येत्या १४ एप्रिल रोजी महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची १३२ वी जयंती आहे. शिंदे- फडणवीस सरकार या राज्यामध्ये आले, तेव्हापासून अनेक उत्सव मोठ्या प्रमाणात साजरे होत आहेत. १४ एप्रिल रोजी अनेक आंबेडकरी अनुयायी सामाजिक, शैक्षणिक अशा सर्व पद्धतीच्या कार्यक्रमांचे आयोजन करत असतात. यंदा १४ एप्रिलला शुक्रवार तर १५ एप्रिल शनिवार आणि १६ तारखेला रविवार येत आहे. जयंती उत्सवाच्या निमित्ताने विविध कार्यक्रमांचे आयोजन होत असते, त्यामुळे सर्व अनुयायांची या तीनही दिवस कार्यक्रमांसाठी रात्री १२ वाजेपर्यंत परवानगीची मागणी आहे, त्या अनुषंगाने दिनांक १४ ते १६ एप्रिल पर्यंत रात्री १२ वाजेपर्यंत राज्यात शासनाने विशेष परवानगी द्यावी, आणि त्या संदर्भात शासनाने घोषणा करावी, असेही या औचित्याच्या मुद्यावर बोलताना आमदार प्रशांत ठाकूर यांनी नमूद केले.

Whatsapp आयकॉन दाबून ही बातमी शेअर करा 

Advertising Space


मुक्त आणि खऱ्या पत्रकारितेसाठी ती कॉर्पोरेट आणि राजकीय नियंत्रणापासून मुक्त असणे आवश्यक आहे. लोक पुढे येऊन सहकार्य करतील तेव्हाच हे शक्य आहे.

आता दान करा

[responsivevoice_button voice="Hindi Female"]