नमस्कार आमच्या आजचा महाराष्ट्र टॉप टेन मराठी न्यूज चॅनेल मधे आपल स्वागत आहे...येथे तुम्हाला ताज्या घडामोडी व बातम्या मिळतील... बातम्या व जाहिरातींसाठी संपर्क - +91 9029198881 करा. आमचे YouTube चॅनेल, Facebook, Telegram ला सबस्क्राईब/ लाईक करा. , हरवलेल्या स्वानंदिची रेल्वे कर्मचाऱ्याने घडवून दिली आई-वडिलां सोबत भेट – आजचा महाराष्ट्र

हरवलेल्या स्वानंदिची रेल्वे कर्मचाऱ्याने घडवून दिली आई-वडिलां सोबत भेट

पत्रकार राजेंद्र दळवी

रत्नागिरी (खेड) :- खेड शहरातील रेल्वे स्टेशनवर कार्यरत असणारे फी रेल्वे कर्मचारी श्री.निलेश मोरे यांनी दिनांक १४/०३/२०२३ रोजी सुटणाऱ्या कोंकण कन्या सुपरफास्ट एक्सप्रेस मध्ये जामगे गावची कु.स्वानंदी अनंत काणेकर वय-१४ सध्या राहणार गोरेगाव, मुंबई येथे जात असताना आपले आई-वडील व भाऊ यांच्या बरोबर गाडीमध्ये चढत असताना आईचा हात सुटून गेल्याने पटकन गाडीमध्ये चढली मात्र गर्दी असल्याने तिचे आई-वडील,भाऊ बाहेरच राहिले आणि अचानक गाडी सुटून मार्गस्त झाली, मात्र तेथे कार्यरत असलेले श्री.निलेश मोरे यांच्या हि गोष्ट लक्षात येताच त्यांनी पुढील स्टेशनला संपर्क करत त्या मुलीजवळ संपर्क कसा होईल यासाठी प्रयत्न सुरु केले.

दिनांक १४/०३/२०२३ रोजी रात्रीच्या गाडीने आपल्या गावाकडचा शिमगा सण साजरा करून काणेकर कुटुंब खेड वरून गोरेगाव कडे जाण्यासाठी निघाले होते. नेहमी प्रमाणे या गाडीला प्रचंड गर्दी असल्याने स्वानंदी आपल्या कुटुंबा समवेत गाडीमध्ये जाण्यासाठी गर्दीचा एक भाग झाली होती. या गर्दीत गाडीमध्ये चडत असताना आपल्या आईचा हात केव्हा सुटला हे तिलाच कळले नाही. आणि या गर्दीमध्ये तीच कुटुंब बाहेरच राहिले. आणि हि बाब स्वानंदीच्या लक्षात येई पर्यंत गाडी सुटली होती. आपली मुलगी गाडीमध्ये बसून गाडी सुटल्याचे लक्ष्यात येताच आई-वडील रडू लागले हा सगळा प्रकार कर्तव्यदक्ष रेल्वे कर्मचारी श्री.निलेश मोरे यांच्या लक्षात येताच त्यांनी काणेकर कुटुंबियांना धीर देत ताबडतोब पुढील करंजाडी स्टेशनला गाडी थांबवून एक रेल्वे कर्मचारी पाठवून मुलीला ताब्यात घेण्यात आले त्यावेळी करंजाडी स्टेशन मास्टर यांच्याशी फोन वरून स्वनंदीच्या आई-वडिलां जवळ बोलणे करून दिले. व मुंबई कडून मडगावला जाणारी २०१११ कोंकण कन्या गाडीत बसवून पुन्हा खेड स्थानकात पाठवण्यात आले.

त्यानंतर कर्तव्यदक्ष श्री.निलेश मोरे यांनी केलेल्या या कामाबद्दल सर्व परिसरातून व त्यांच्या कर्मचारी वर्गाकडून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. तसेच स्वनंदीच्या आई-वडिलांनी मोरे यांचे आभार मानले.

Whatsapp आयकॉन दाबून ही बातमी शेअर करा 

Advertising Space


मुक्त आणि खऱ्या पत्रकारितेसाठी ती कॉर्पोरेट आणि राजकीय नियंत्रणापासून मुक्त असणे आवश्यक आहे. लोक पुढे येऊन सहकार्य करतील तेव्हाच हे शक्य आहे.

आता दान करा

[responsivevoice_button voice="Hindi Female"]