नमस्कार आमच्या आजचा महाराष्ट्र टॉप टेन मराठी न्यूज चॅनेल मधे आपल स्वागत आहे...येथे तुम्हाला ताज्या घडामोडी व बातम्या मिळतील... बातम्या व जाहिरातींसाठी संपर्क - +91 9029198881 करा. आमचे YouTube चॅनेल, Facebook, Telegram ला सबस्क्राईब/ लाईक करा. , चंद्रशेखर कामथे यांची रायगड जिल्ह्याच्या विधी न्यायालयाच्या कक्ष प्रमुखपदी निवड – आजचा महाराष्ट्र

चंद्रशेखर कामथे यांची रायगड जिल्ह्याच्या विधी न्यायालयाच्या कक्ष प्रमुखपदी निवड

 

पत्रकार समीर बामुगडे

रायगड (रोहा) :- नागोठणे गावाच्या शिरपेचामध्ये अजून एक मानाचा तुरा रोवला गेला आहे.नागोठणे आंगरआळी येथील ॲड. चंद्रशेखर चंद्रकांत कामथे यांची सर्वोच्च न्यायालयाच्या वतीने रायगड जिल्हा विधी सहाय्य बचाव कक्ष प्रणालीच्या उपमुख्यपदी निवड करण्यात आलेली आहे.

ॲड.ए.एस.शेख सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमुर्ती यांच्या शुभहस्ते विधी सहाय्य बचाव कक्ष प्रणालीचे उद्घाटन मुंबई येथे करण्यात आले होते.त्यांच्या आदेशानुसार दि.१३ मार्च,२०२३ पासुन रायगड जिल्ह्यातील विधी सहाय्य बचाव कक्ष प्रणालीची सुरुवात करण्यात आलेली आहे.

ॲड.चंद्रशेखर कामथे हे आपल्या वडिलांप्रमाणे शांत,व हुशार स्वभावाचे आहेत.आपल्या वकीली व्यवसायाबरोबर सामाजिक कार्याची आवड असणारे कामथे यांच्यावर शासनाने नवीन जबाबदारी सोपविली आहे. या विधी कमिटीमध्ये अन्य चार लोकांचीही नेमणुक करण्यात आलेली आहे.ॲड.कामथे यांच्यावर नागोठणे तसेच संपूर्ण जिल्ह्यातुन अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

Whatsapp आयकॉन दाबून ही बातमी शेअर करा 

Advertising Space


मुक्त आणि खऱ्या पत्रकारितेसाठी ती कॉर्पोरेट आणि राजकीय नियंत्रणापासून मुक्त असणे आवश्यक आहे. लोक पुढे येऊन सहकार्य करतील तेव्हाच हे शक्य आहे.

आता दान करा

[responsivevoice_button voice="Hindi Female"]