नमस्कार आमच्या आजचा महाराष्ट्र टॉप टेन मराठी न्यूज चॅनेल मधे आपल स्वागत आहे...येथे तुम्हाला ताज्या घडामोडी व बातम्या मिळतील... बातम्या व जाहिरातींसाठी संपर्क - +91 9029198881 करा. आमचे YouTube चॅनेल, Facebook, Telegram ला सबस्क्राईब/ लाईक करा. , भोकरदन शहरातील अतिक्रमण हटविण्याची कार्यवाही राजकीय दबावापोटी एकतर्फि,सरकारी मालमत्तेचे व जनतेच्या पैशांचे नुकसान करणारी असे बोरसे गुरुजी यांनी म्हटले आहे – आजचा महाराष्ट्र

भोकरदन शहरातील अतिक्रमण हटविण्याची कार्यवाही राजकीय दबावापोटी एकतर्फि,सरकारी मालमत्तेचे व जनतेच्या पैशांचे नुकसान करणारी असे बोरसे गुरुजी यांनी म्हटले आहे

प्रतिनीधी श्रीकृष्ण शेळके

जालना (भोकरदन) :- भोकरदन शहरात जालना रोडवरील अतिक्रमण हटवण्याची कार्यवाही करण्यात आली. ही कार्यवाही एकतर्फी झालेली आहे. असे प्रसार माध्यमांशी बोलतांना बोरशे गुरुजी म्हणाले.या वेळी पार्टिचे पदाधिकारी महजाद खाॅंन, सोळंके पाटील ,हाजी भाई संतोष बोरशे,सुरेश लोखंडे, रामेश्वर काळे यांच्यासह पदाधिकारी हजर होते. याबाबत सविस्तर विचार व्यक्त करतांना ते म्हणाले की,रस्ता रुंदीकरण ही अतिशय आवश्यक बाब आहे.परंतु रस्ता रुंद करण्यासाठी मार्किंग करतांना रस्त्याच्या सेंटर पासुन दोन्ही बाजुला सारखे अंतर घेवुन मार्किंग करण्यात यावी असा निंयम आहे असे असतांना काही खास लोकांच्या मालमत्ता वाचवण्यासाठी एका बाजुला कमी अंतर तर सरकारी कार्यालयांकडच्या बाजुने जास्त अंतर घेवुन मुद्दाम चुकीची मार्किंग करण्यात आलेली आहे. वास्तविक पाहता सरकारी कार्यालयांच्या जागेवर अतिक्रमण केलेले नाही. सरकारी कार्यालयाच्या बांधकामावर करण्यात आलेला खर्च वाया गेला असुन पुन्हा बांधकाम करण्यासाठी जनतेच्या पैशातुन खर्च करावा लागणार आहे.त्यामुळे घाटी रुग्णालय, पंचायत समीती कार्यालय,जि.प. शाळा , पोलीस काॅर्टर, सार्वजनीक बांधकाम विभागाचे कार्यालय व गेस्ट हाऊस या सर्वच कार्यालयाच्या बांधकामांना अतिक्रमण गृहीत धरुन काढण्यात आलेले आहे. मग प्रश्न असा आहे की,या सरकारी कार्यालय प्रमुखांनी अतिक्रमण का केले ? या कार्यालयाच्या प्रमुखांना अतिक्रण काढुन टाकण्या बाबत नोटीस देण्यात आली नव्हती काय ? जर नोटीस देण्यात आलेली असेल तर त्यांनी अतिक्रमण का काढुन घेतले नाही ? या अधिकार्‍यांनी नोटीसचा आदर का केला नाही ? प्रशासकीय कार्यवाहीची वाट का पाहिली. प्रशासनाला या कार्यालयांचे अतिक्रमण काढण्यासाठी खर्च करावा लागला. हा खर्चसुध्दा जनतेच्याच पैशातुन झाला आहे म्हणचे अगोदरचे बांधकाम केल्याचा खर्च, बांधकाम पाडण्याचा खर्च, नव्याने बांधकाम करण्यासाठीचा खर्च हा सर्व खर्च फक्त संबधीत विभागाने चुकीची मार्किंग करण्यामुळे झालेला आहे. चुकिच्या मार्किंगला संबंधीत कार्यालय प्रमुखांनी आक्षेप घेतला नाही.त्यामुळे खर्चाचा भुर्दंड हाकनाक जनतेला बसला आहे.त्यामुळे चुकीची मार्किंग करणारे अधिकारी व चुक असतांना आक्षेप न घेणारे व अतिक्रमण करणारे अधिकारी जबाबदार आहेत. त्यामुळे झालेल्या नुकसानीचा खर्च व बांधकामासाठी होणारा खर्च जनतेला अधिकार्‍यांच्या निष्काळजीमुळे होणारा भुर्दंड आहे. हा खर्च सबंधीत आरोग्य अधिकारी, गटविकास अधिकारी, जि.प. शाळेचे मुख्याध्यापक, पोलीस क्वार्टर विभाग प्रमुख , सार्वजनीक बांधकाम उप अभियंता यांच्या पगारातुन वसुल करावा व त्यांच्यावर फौजदारी गुन्हे दाखल करावेत. अशी मागणी पार्टिच्या वतीने करणार आहे.या कार्यवाहीमुळे आम आदमींची दुकाने काढण्यात आली अतिक्रमण हटविण्यामुळे लहान दुकानदार, टपरीवाले अडचणीत आले आहेत. त्यांचा पोटापाण्याचा प्रश्न निर्माण झाला आहे.त्यांना मदतीची गरज आहे. आम आदमींचे अतिक्रमण काढले परंतु नियमाप्रमाणे जे जे अतिक्रमनात आहेत त्या सर्वच खास माणसांचे अतिक्रमण काढण्यात यायला पाहिजे होते. प्रशासनाने कायद्यापुढे सर्वांना सारखी वागणुक द्यालला पाहिजे होती.. तरच प्रशासन कौतुकास व अभिनंदनास पात्र राहीले असते व प्रशासनाचे जनतेतुन मनपुर्वक स्वागत झाले असते. राजकिय दबावापोटी एकतर्फि कार्यवाही झाली असुन सरकारी मालमत्तेचा व जनतेच्या पैशांचा विचार करण्यात आलेला नाही.आम आदमीवर अन्याय झालेला आहे. 

बोरशे गुरुजी  जालना जिल्हा उपाध्यक्ष  आम आदमी पार्टि ९६०४६२५४९१

Whatsapp आयकॉन दाबून ही बातमी शेअर करा 

Advertising Space


मुक्त आणि खऱ्या पत्रकारितेसाठी ती कॉर्पोरेट आणि राजकीय नियंत्रणापासून मुक्त असणे आवश्यक आहे. लोक पुढे येऊन सहकार्य करतील तेव्हाच हे शक्य आहे.

आता दान करा

[responsivevoice_button voice="Hindi Female"]