युवा विधिज्ञ रविश पाटील बीबीए एलएलबी परीक्षा उत्तीर्ण ; सर्वत्र अभिनंदनाचा वर्षाव….
प्रतिनिधी
ठाणे(भिवंडी )आ .मा. टॉ. टे. न्यू :- भिवंडी तालुक्यातील ओवळी गावचे सुपुत्र ॲड.कैलास श्रीपत पाटील व ओवळी गावच्या माजी सरपंच सौ.अस्मिता कैलास पाटील यांचे चिरंजीव रविश कैलाश पाटील यांनी बीबीए एलएलबी (BBA LLB) पदवी यशस्वीरीत्या संपादन करून आपल्या कुटुंबासह परिसराचे नाव उज्ज्वल केले आहे. 
कठोर परिश्रम, समर्पण आणि जिद्दीच्या जोरावर त्यांनी कायद्याच्या क्षेत्रातील शिक्षण पूर्ण करत ही उल्लेखनीय कामगिरी साध्य केली आहे.या यशाबद्दल त्याचे दैनिक स्वराज्य तोरण परिवाराकडून हार्दिक अभिनंदन व पुढिल वाटचालीस शुभेच्छा तसेच नातेवाईक, मित्रपरिवारा कडून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. भविष्यात न्यायव्यवस्था आणि समाजसेवेच्या क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करून उज्ज्वल यश संपादन करावे, अशा शुभेच्छा सर्व स्तरांतून व्यक्त केल्या जात आहेत.अँड.रविश कैलास पाटील याच्या या यशामुळे कुटुंबीयांमध्ये आनंदाचे वातावरण असून, त्यांच्या पुढील वाटचालीसाठी सर्वत्र शुभेच्छा दिल्या जात आहेत.”कष्ट, समर्पण आणि चिकाटीच्या बळावर मिळविलेले हे यश आगामी उज्ज्वल भविष्याची नांदी ठरो,” अशा भावना व्यक्त केल्या आहेत.
|
Whatsapp आयकॉन दाबून ही बातमी शेअर करा |
Advertising Space













