नमस्कार आमच्या आजचा महाराष्ट्र टॉप टेन मराठी न्यूज चॅनेल मधे आपल स्वागत आहे...येथे तुम्हाला ताज्या घडामोडी व बातम्या मिळतील... बातम्या व जाहिरातींसाठी संपर्क - +91 9029198881 करा. आमचे YouTube चॅनेल, Facebook, Telegram ला सबस्क्राईब/ लाईक करा. , जिल्हा स्तरीय कराटे स्पर्धेत मुरूडच्या विद्यार्थ्याची नेत्रदीपक कामगिरी : दोन सुवर्ण पदकासह १६ पदकांची कमाई – आजचा महाराष्ट्र

जिल्हा स्तरीय कराटे स्पर्धेत मुरूडच्या विद्यार्थ्याची नेत्रदीपक कामगिरी : दोन सुवर्ण पदकासह १६ पदकांची कमाई

प्रतिनीधी मुरुड

रायगड(मुरुड जंजिरा) :- पनवेल येथे जिल्हास्तरीय तिसरी सोके क्लेमेंट सू कराटे चॅम्पियनशिप -२०२३ या स्पर्धेत मुरूड तालुक्यातील विद्यार्थ्यांनी नेत्रदीपक कामगिरी करून दोन सुवर्ण पदकासह १६ पदकांची कमाई केली !

इंडिया गोशिन रियू कराटे असोसिएशन व शिहान – राजू कोहली यांनी ही कराटेची स्पर्धा आयोजित केली होती. या जिल्हास्तरीय कराटे स्पर्धेमध्ये रायगड जिल्ह्यातून मुरुड, रोहा, अलिबाग, नागोठणे, कर्जत, पेण, पनवेल, खोपोली, श्रीवर्धन इत्यादी जिल्ह्यातून या कराटेच्या स्पर्धेकरिता खेळाडूं आले होता. तसेच या स्पर्धेमध्ये १३० हून अधिक विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता. पुन्हा एकदा मुरुड तालुक्यातील कराटेपट्टूंनी तालुक्याचे नाव उज्वल केले . २ सुवर्ण पदके, ५ रौप्य पदके, ९ कास्य पदके एकूण १६ पदकांची कमाई करीत मुरुड तालुक्याच्या विद्यार्थ्यांनी मुरूडच्या शिरपेचात मानाचा तुरा खोवला आहे.

या स्पर्धेमध्ये मुरुडच्या कराटेपटूंनी नेत्रदीप कामगिरी केली. तसेच विद्यार्थ्यांना उत्कृष्ट विद्यार्थी हे बक्षीस सुद्धा भेटले आहे. सर्व विद्यार्थ्यांची नावे पुढील प्रमाणे आहेत

नचिकताज हायस्कूल / वंडर किड्स आस्था सचिन अपराध – काता प्रथम क्रमांक ट्रॉफी व कास्य पदक, स्नेहला प्रीतम पाटील – रौप्य पदक व कास्य पदक, स्वयं सचिन अपराध – काता तृतीय क्रमांक ट्रॉफी व कास्य पदक, मेहबूब हायस्कूल – विहूर पूर्वा गजानन घाग – रौप्य पदक व कास्य पदक, मॉर्निंग स्टार स्कूल – मुरुड परणद जितेंद्र कांबळे – काता तृतीय क्रमांक ट्रॉफी व कांस्य पदक,

नज हायस्कूल नवीन मजगाव स्वरा निशांत विरकोट – काता प्रथम क्रमांक ट्रॉफी व रौप्य पदक, मिंधळे हायस्कूल रोहा अवधूत केतन भोसले – काता तृतीय क्रमांक ट्रॉफी व रौप्य पदक, वसंतराव नाईक आर्ट्स अँड कॉमर्स कॉलेज

प्रवेश प्रदीप पुलेकर – काता तृतीय क्रमांक ट्रॉफी व रौप्य पदक हे सर्व विद्यार्थी ओकिनावा रियू कियू शितो – रियू कराटे डो क्योकाई इंडिया‌ या संस्थेच्या अंतर्गत शिकत आहेत. तसेच यांना शिहान – डॉ. आदित्य अनिल ( एशिया चीफ ), सेंसाय – सनी राजेंद्र खेडेकर ( महाराष्ट्र मुख्य प्रशिक्षक व पश्चिम भारत संचालक ), सेंसाय – शिवम धीरेंद्र सिंग, सेंपाय – पर्वणी नरेंद्र चोरघे, सेंपाय – तन्वी उषापती म्हात्रे, सेंपाय – अनुज राजेश भोईर, सेंपाय – नेहाल अरविंद घोले इत्यादिंचे मार्गदर्शन लाभले. तसेच शाळेतील मुख्याध्यापक व त्यांच्या स्टाफ विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले.

Whatsapp आयकॉन दाबून ही बातमी शेअर करा 

Advertising Space


मुक्त आणि खऱ्या पत्रकारितेसाठी ती कॉर्पोरेट आणि राजकीय नियंत्रणापासून मुक्त असणे आवश्यक आहे. लोक पुढे येऊन सहकार्य करतील तेव्हाच हे शक्य आहे.

आता दान करा

[responsivevoice_button voice="Hindi Female"]