नमस्कार आमच्या आजचा महाराष्ट्र टॉप टेन मराठी न्यूज चॅनेल मधे आपल स्वागत आहे...येथे तुम्हाला ताज्या घडामोडी व बातम्या मिळतील... बातम्या व जाहिरातींसाठी संपर्क - +91 9029198881 करा. आमचे YouTube चॅनेल, Facebook, Telegram ला सबस्क्राईब/ लाईक करा. , के व्ही कन्या शाळेच्या १९६६-६७ च्या SSC batch विद्यार्थिनी चे स्नेह मिलन जैन हॉल पनवेल येथे सम्पन्न झाले . – आजचा महाराष्ट्र

के व्ही कन्या शाळेच्या १९६६-६७ च्या SSC batch विद्यार्थिनी चे स्नेह मिलन जैन हॉल पनवेल येथे सम्पन्न झाले .

प्रतिनीधी पनवेल

रायगड (पनवेल) :- के व्ही. कन्या शाळेच्या ssc बॅच च्या विद्यार्थिनींचे स्नेह मिलन कार्यक्रम जैन हॉल पनवेल येथे साजरा झाला. या कार्यक्रमात सत्तरी पार केलेल्या सुमारे ४० जणींनी सहभाग घेतला . अमेरिकेत स्थायीक असलेल्या उज्ज्वला शेठ तसेच बैंगलोर, नाशिक, पुणे , ठाणे , डोंबिवली आदि विविध शहरांतून आलेल्यानी ७०/७५ नव्हे तर १७ वर्ष वयाच्या उत्साहाने सहभाग घेतला . सर्वांनी शाळेला भेट देऊन जून्या आठवणींना ऊजाळा दिला .

सर्व शिक्षक वृंदाने यथोचित स्वागत केले . शकुंतला बांठीया , सुमन नातू, शकुंतला दिवटे, कुन्दा कुळकर्णी , सुलोचना घांग्रेकर, उज्ज्वला शेठ , पाटकर मैडम , अंजली भगत , प्रेमा सोहोनी , निर्मला मुनोथ, शैला गड़करी आणि अनेक जणिंनी आपले मनोगत व्यक्त केले . बालकलाकार वृद्धी बांठीया हिने गाणी सादर करुन सर्वांची मने जिंकली . सर्वांना एकत्र आणुन हा कार्यक्रम सफल आणि अविस्मरणीय करण्यासाठी शकुंतला बांठीया ने ( मेहता, बंगलोर ) अथक मेहनत घेतली . शालेय मैत्रीला वयाचे बंधन नसते याचे मूर्तिमंत उदाहरण असा हा स्नेह मिलनाचा सोहळा !

सकाळी ९ वाजता सुरू झालेला कार्यक्रम संध्याकाळी ६ वाजता संपला . जड़ अंत:कर्णाने सर्वानी निरोप घेतला .

Whatsapp आयकॉन दाबून ही बातमी शेअर करा 

Advertising Space


मुक्त आणि खऱ्या पत्रकारितेसाठी ती कॉर्पोरेट आणि राजकीय नियंत्रणापासून मुक्त असणे आवश्यक आहे. लोक पुढे येऊन सहकार्य करतील तेव्हाच हे शक्य आहे.

आता दान करा

[responsivevoice_button voice="Hindi Female"]