दलित बहुजन मताचे विभाजन रोखण्यासाठी रविंद्र धंगेकर यांना बहुजन जनता दलाचा जाहीर पाठींबा.पंडितभाऊ दाभाडे
प्रतिनिधि पुणे
पुणे :- पुणे शहरातील २१५ कसबा विधानसभा मतदारसंघातील महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार रवींद्र धंगेकर यांना पोटनिवडणुकीत विजय करण्यासाठी निर्णायक ठरणारे दलित बहुजन समाजाच्या मताचे विभाजन रोखण्यासाठी बहुजन जनता दलाचे संस्थापक अध्यक्ष पंडितभाऊ दाभाडे कसबा मतदार संघातील बहुजन जनता दलाच्या कार्यकर्त्यांनी पदाधिकारी यांची एक बैठक घेऊन या बैठकीमध्ये कार्यकर्ते व पदाधिकारी यांच्याशी सविस्तर चर्चा करून महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार रवींद्र धंगेकर यांना विजय करण्यासाठी बहुजन जनता दलाने जाहीर पाठिंबा दिला आहे

पुणे गंज पेठ येथील सावित्रीबाई फुले सभागृहात महाविकास आघाडीचे उमेदवार रवींद्र धंगेकर यांच्या प्रचारार्थ राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार साहेब यांच्या प्रमुख उपस्थितीतआयोजित करण्यात आलेल्याअल्पसंख्यांक समाजाच्या मेळाव्यात बहुजन जनता दलाचे संस्थापक अध्यक्ष पंडित भाऊ दाभाडे यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार साहेब यांच्या उपस्थितीत रवींद्र धंगेकर यांना बहुजन जनता दलाचा जाहीर पाठिंबा दिल्याचे लेखि पत्र दिल्याचे बहुजन जनता दलाचे संस्थापक अध्यक्ष पंडित भाऊ दाभाडे यांनी सांगितले आहे.
कसबा विधानसभा मतदार संघातील बहुजन जनता दलाच्या कार्यकर्त्यांनी व पदाधिकाऱ्यांनी आणि दलित बहुजन समाजाच्या मतदारांनी महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार रवींद्र धंगेकर यांना आपले अमूल्य मत देऊन त्यांना विजय करावे असे आव्हान बहुजन जनता दलाचे संस्थापक अध्यक्ष पंडित भाऊ दाभाडे यांनी केले
यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी खासदार वंदनाताई चव्हाण अंकुश काकडे. रमेश बागवे माजी गृहमंत्री मोहन जोशी उल्हास दादा पवार अभय छाजेड प्रशांत जगताप युसुफ बागवान प्रशिष पाटील शिवसेना काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस आणि बहुजन जनता दलाचे कार्यकर्ते व पदाधिकारी उपस्थितीत होते
|
Whatsapp आयकॉन दाबून ही बातमी शेअर करा |
Advertising Space













