नमस्कार आमच्या आजचा महाराष्ट्र टॉप टेन मराठी न्यूज चॅनेल मधे आपल स्वागत आहे...येथे तुम्हाला ताज्या घडामोडी व बातम्या मिळतील... बातम्या व जाहिरातींसाठी संपर्क - +91 9029198881 करा. आमचे YouTube चॅनेल, Facebook, Telegram ला सबस्क्राईब/ लाईक करा. , रायगड जिल्हा प्रेस क्लबचे सरचिटणीस पत्रकार शशिकांत मोरे यांना पितृशोक! – आजचा महाराष्ट्र

रायगड जिल्हा प्रेस क्लबचे सरचिटणीस पत्रकार शशिकांत मोरे यांना पितृशोक!

रोहा प्रतिनीधी

रायगड (रोहा) दि. २२ फेब्रु. :- रोहा तालुक्यातील धाटाव येथील ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते चंद्रकांत शिवराम मोरे यांचे मंगळवारी २१ फेब्रु. रोजी अकस्मात निधन झाले. मृत्यु समयी ते सुमारे ६७ वर्षांचे होते. रायगड जिल्हा प्रेस क्लबचे सरचिटणीस तथा मराठी पत्रकार परिषदेचे प्रतिनिधी शशिकांत मोरे आणि सामाजिक कार्यकर्ते सूर्यकांत मोरे यांचे ते वडील होते .स्व. चंद्रकांत मोरे यांच्या पश्चात त्यांच्या पत्नी, मुले, सुना नातवंडे तसेच भाऊ, बहिण असा मोठा परिवार आहे. अत्यंत मनमिळावू, प्रेमळ स्वभावाचे आणी परोपकारी

वॄत्तीचे असलेले चंद्रकांत मोरे हे शांत, संयमी आणि अजातशत्रु म्हणून ही सर्वपरिचित होते. धार्मिक तसेच सामाजिक क्षेत्राची त्यांना विशेष आवड होती. सुरुवातीच्या काळापासूनच छोटे मोठे व्यवसाय करण्याचा मार्ग त्यांनी पत्करलेला , त्यामुळे धाटाव पंचक्रोशी आणि तालुक्यात त्यांचे सलोख्याचे सबंध होते. वारकरी संप्रदायाकडे त्यांना विशेष ओढ होती परिणामी हरिभक्त परायणाचा मार्ग स्वीकारत त्यांनी आपल्या जीवनात मांसाहाराचा त्याग केला होता . त्यांच्या निधनाचे वृत्त समजताच धाटाव येथील त्यांच्या निवास्थानी मोठा जनसमुदाय लोटला. मान्यवरांसह त्यांचे आप्तस्वकीयांनी त्यांच्या निवास्थानी अंत्यदर्शन घेऊन मोरे परिवाराचे सात्वंन केले. त्यांच्या अंत्ययात्रेत विविध स्तरातील मान्यवरांसह मोठ्या संख्येने लोक उपस्थित होते. यावेळी ह. भ. प. पुरूषोत्तम महाराज पाटील, माजी सरपंच सतिश भगत आणि रोहा प्रेस क्लबचे अध्यक्ष राजेंद्र जाधव आदींनी त्यांना श्रद्धांजली वाहिली, त्यांची दशक्रियाविधी गुरूवार दि. ०२ मार्च रोजी धाटाव तलाव येथे तर तेरावे उत्तरकार्य रविवार दि. ०५ मार्च रोजी त्यांच्या निवासस्थानी होणार आहे.

Whatsapp आयकॉन दाबून ही बातमी शेअर करा 

Advertising Space


मुक्त आणि खऱ्या पत्रकारितेसाठी ती कॉर्पोरेट आणि राजकीय नियंत्रणापासून मुक्त असणे आवश्यक आहे. लोक पुढे येऊन सहकार्य करतील तेव्हाच हे शक्य आहे.

आता दान करा

[responsivevoice_button voice="Hindi Female"]