खेडमध्ये पत्रकार शशिकांत वारीशे यांच्या हत्येचा निषेध काळ्या फीती लावून केले मूक निदर्शन

रत्नागिरी (खेड) :- रत्नागिरी जिल्ह्यातील राजापूर येथील पत्रकार शशिकांत वारीशे यांची झालेली निर्घृण हत्या आणि राज्यातील पत्रकारांवर दिवसेंदिवस होत असलेले हल्ले या सर्व घटनांचा निषेध
करण्यासाठी खेड मध्ये विविध सोशल मीडिया व इलेक्ट्रॉनिक मीडियाच्या वृत्त प्रतिनिधींनी शुक्रवारी खेड येथील तहसील कार्यालयाच्या आवारात मूक निदर्शने करत निषेध नोंदवत तहसील व पोलीस प्रशासनाला निवेदन सादर केले पत्रकार शशिकांत वारीशे निर्घृण हत्या प्रकरणाचा खटला फास्ट ट्रॅक न्यायालयामार्फत चालवावा तसेच वारीशे यांची हत्या करणारा पंढरीनाथ आंबेरकर 
यांची गुन्हेगारी पार्श्वभूमी पाहता त्यास मोक्का लावावा आणि हा खटला चालविण्यासाठी विशेष सरकारी वकील नियुक्त करावेत आणि वारीशे यांची आर्थिक परिस्थिती लक्षात घेता त्यांना ५० लाख रुपये सरकारने मदत द्यावी शी मागणी प्रशासनाला सादर करण्यात आलेल्या निवेदनात करण्यात आल्या आहेत या आंदोलनात जेष्ठ पत्रकार श्रीकांत चाळके दिवाकर प्रभू, सदानंद जंगम,हर्षदीप सासने ,दिलीप देवळेकर, शशांक सिनकर, उत्तम जैन, किशोर साळवी, जितेश कोळी, चंद्रकांत बनकर ,सिद्धेश पर शेटे, अनुप जोशी, देवेंद्र जाधव ज्ञानेश्वर रोकडे, जमादार संतोष आंब्रे, सुनील आंब्रे, रुपेश चव्हाण आदी उपस्थित होते
|
Whatsapp आयकॉन दाबून ही बातमी शेअर करा |
Advertising Space













