नमस्कार आमच्या आजचा महाराष्ट्र टॉप टेन मराठी न्यूज चॅनेल मधे आपल स्वागत आहे...येथे तुम्हाला ताज्या घडामोडी व बातम्या मिळतील... बातम्या व जाहिरातींसाठी संपर्क - +91 9029198881 करा. आमचे YouTube चॅनेल, Facebook, Telegram ला सबस्क्राईब/ लाईक करा. , भोकरदन न्यायालयाच्या परिसरात घटस्फोट मिळाल्यानंतर महिलेने सासऱ्याच्या व पतीच्या कानाखाली मारल्यामुळे दोन गटात हाणामारी – आजचा महाराष्ट्र

भोकरदन न्यायालयाच्या परिसरात घटस्फोट मिळाल्यानंतर महिलेने सासऱ्याच्या व पतीच्या कानाखाली मारल्यामुळे दोन गटात हाणामारी

प्रतिनिधि श्रीकृष्ण शेळके

जालना (भोकरदन) :- भोकरदन तालुक्यातील पोखरी येथील सुवर्णा सुभाष लुटे हिचा विवाह आडगावभोंबे (तालुका भोकरदन ) येथील शुभम विनायक साळवे यांच्या सोबत झाला होता. मात्र आपसात पटत नसल्याने सुवर्णा काही दिवसांपासून माहेरी राहत होती. त्यानंतर नातेवाईकांनी एकत्र येऊन बैठक घेत दोघांनी फारकत घेण्याचा निर्णय घेतला. त्याअनुषंगाने दोन्ही कडील नातेवाईक आज दुपारी भोकरदन न्यायालयाच्या परिसरात आले. व वकिलांकडून नोटरीकरून घेत दोघांनी फारकत घेतली. मात्र शुभम याने सुवर्णास ठरल्याप्रमाणे ४ लाख रुपये दिल्याचे सर्वञ परिसरात चर्चा होत होती व हे सर्व शांततेत पार पडले पण घटस्फोट मिळाल्याने महिलेने सासऱ्याच्या व पतीच्या कानाखाली मारल्यामुळे न्यायालयाच्या आवारात दोन गटात फेमिस्टाइल हाणामारी झाल्याची घटना आज दुपारी तीन वाजता घडली या प्रकरणी न्यायालयाच्या आदेशाने पोलिसांनी दोन्ही गटाच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहेत

 

Whatsapp आयकॉन दाबून ही बातमी शेअर करा 

Advertising Space


मुक्त आणि खऱ्या पत्रकारितेसाठी ती कॉर्पोरेट आणि राजकीय नियंत्रणापासून मुक्त असणे आवश्यक आहे. लोक पुढे येऊन सहकार्य करतील तेव्हाच हे शक्य आहे.

आता दान करा

[responsivevoice_button voice="Hindi Female"]