नमस्कार आमच्या आजचा महाराष्ट्र टॉप टेन मराठी न्यूज चॅनेल मधे आपल स्वागत आहे...येथे तुम्हाला ताज्या घडामोडी व बातम्या मिळतील... बातम्या व जाहिरातींसाठी संपर्क - +91 9029198881 करा. आमचे YouTube चॅनेल, Facebook, Telegram ला सबस्क्राईब/ लाईक करा. , मन्सूर भाई जोगीलकर यांचा खवटी पंचक्रोशी तर्फे सत्कार – आजचा महाराष्ट्र

मन्सूर भाई जोगीलकर यांचा खवटी पंचक्रोशी तर्फे सत्कार

पत्रकार राजेंद्र दळवी

रत्नागिरी (खेड) :- न्यू इंग्लिश स्कूल खवटी आणि पी के दरेकर ज्युनिअर कॉलेज यांचा वार्षिक स्नेहसंमेलन सोहोळा २०२३ नुकताच आनंदात पार पडला. यावेळी अनेक मान्यवर उपस्थित होते.

येथील प्रशालेला नेहमीच देणगी स्वरुपात योगदान देणारे आपल्या खवटी पंचक्रोशीतील सुपुत्र, महाबळेश्वर येथील प्रसिद्ध उद्योजक श्री. मन्सूर भाई हमीद जोगीलकर यांचा संपूर्ण पंचक्रोशीच्या वतीने शाल आणि श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला. खवटी प्रशालेच्या विज्ञान प्रयोगशाळेच्या साहित्यासाठी त्यांनी एक लाख रुपये मदत देण्याचे जाहीर केले आहे. त्याबद्दल त्यांचे सर्व स्तरीय कौतुक होत आहे. तसेच कालच्या या कार्यक्रमाला मन्सूर भाई यांनी रोख रक्कम ११ हजार बक्षिस म्हणून संस्थेला दिले. तसेच १९८८ च्या बॅचचे टीम प्रमुख उद्योजक श्री. हेमंत दरेकर साहेब यांनी त्यांच्या संपूर्ण बॅचच्या वतीने रोख रक्कम रुपये २५ हजार संस्थेला बक्षिस म्हणून दिले. त्याबद्दल त्यांच्या संपूर्ण बॅचचे कौतुक होत आहे.तसेच नेरोलॅक कंपनी लोटे यांनी संपूर्ण खोल्यांना रंगरंगोटी करण्यासाठी रंगाचे साहित्य उपलब्ध करुन संस्थेला मदत केली. यावेळी संस्थेचे अध्यक्ष श्री. भालचंद्र ऊर्फ राजा बेलोसे साहेब यांनी सर्व मदत करणार्‍यांना धन्यवाद देऊन आभार मानले .

Whatsapp आयकॉन दाबून ही बातमी शेअर करा 

Advertising Space


मुक्त आणि खऱ्या पत्रकारितेसाठी ती कॉर्पोरेट आणि राजकीय नियंत्रणापासून मुक्त असणे आवश्यक आहे. लोक पुढे येऊन सहकार्य करतील तेव्हाच हे शक्य आहे.

आता दान करा

[responsivevoice_button voice="Hindi Female"]