नमस्कार आमच्या आजचा महाराष्ट्र टॉप टेन मराठी न्यूज चॅनेल मधे आपल स्वागत आहे...येथे तुम्हाला ताज्या घडामोडी व बातम्या मिळतील... बातम्या व जाहिरातींसाठी संपर्क - +91 9029198881 करा. आमचे YouTube चॅनेल, Facebook, Telegram ला सबस्क्राईब/ लाईक करा. , रोहा येथील मुक्त पत्रकार राजेश हजारे यांना मातृशोक – आजचा महाराष्ट्र

रोहा येथील मुक्त पत्रकार राजेश हजारे यांना मातृशोक

पत्रकार समीर बामुगडे

रायगड (रोहा) :- रोहा येथील मुक्त पत्रकार तसेच आदिवासी, शोषित, वंचिताचे प्रश्न नेहमी आपले लेखणीतून मांडणारे ज्येष्ठ पत्रकार राजेश वामन हजारे यांच्या मातोश्री कै. मंगलाताई वामन हजारे यांचे नुकतेच वृद्धकाळाने निधन झाले.

रोह्यामध्ये हजारे काकू म्हणून सर्वांना परिचित असलेल्या शांत, मनमिळाऊ, प्रेमळ, सत्वशील सरळ मार्गी, कष्टाळू, म्हणून परिचित असलेल्या तसेच सामाजिक कार्यात नेहमी हातभार लावणाऱ्या तसेच विश्व् हिंदू परिषदेच्या माजी जेष्ठ कार्यकर्त्या, दुर्गादेवी सत्संग मंडळाच्या मंडळाच्या ज्येष्ठ कार्यशील सदस्या श्रीमती मंगलाताई वामन हजारे यांचे नुकतेच वृद्धपकाळाने डोंबिवली येथे निधन झाले.

धार्मिक अध्यात्मिक कार्यात त्यांचा नेहमी सहभाग असायचा त्यांना अध्यात्माची त्यांना आवड असल्याने विविध धर्मग्रंथांचे वाचन नामस्मरणव्रत वैकल्ये करण्याची त्यांना आवड होती. दुर्गादेवी सत्संग मंडळाच्या अध्वर्य कै. विमलाताई मेहेंदळे यांच्या त्या निकटवर्तीय होत्या दुर्गादेवी मंदिरातील सत्संग मंडळाच्या विविध अध्यात्मिक महोत्सवात त्यांचा सहभाग असायचा विश्व हिंदू परिषदेच्या राम मंदिर आंदोलनात त्यांनी आपले विशेष योगदान दिले होते. अशा धार्मिक शोषिक,कष्टाळू, कार्यशील,अजातशत्रू, असलेल्या धार्मिक कार्यात हिरीरीने भाग घेऊन कुठल्याही प्रसिद्धीची हाव नसलेल्या कै. मंगलाताई हजारे यांच्या निधनाने सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे.

त्यांचे सर्व विधी ३ फेब्रुवारी रोजी शंखेश्वर नगर सी. ३२०४ मानपाडा,देसलेपाडा डोंबिवली पूर्व, पटेल डेअरी शेजारी डोंबिवली येथे होणार आहेत अधिक माहितीसाठी ८२ ३७ ३७ ७० ४३ येथे संपर्क साधावा.

कै मंगलाताई हजारे यांच्या निधनाने संपूर्ण रोहा तालुक्यात शोककळा पसरली असून सर्वत्र दुःख व्यक्त केली जात आहे.

Whatsapp आयकॉन दाबून ही बातमी शेअर करा 

Advertising Space


मुक्त आणि खऱ्या पत्रकारितेसाठी ती कॉर्पोरेट आणि राजकीय नियंत्रणापासून मुक्त असणे आवश्यक आहे. लोक पुढे येऊन सहकार्य करतील तेव्हाच हे शक्य आहे.

आता दान करा

[responsivevoice_button voice="Hindi Female"]