चिपळूणात राष्ट्रवादीच्या युवा पदाधिकार्यांचा भारतीय जनता पार्टीत जाहिर प्रवेश

रत्नागिरी (चिपळूण) :- चिपळूण मध्ये राष्ट्रवादीच्या युवा पदाधिकाऱ्यांचा भारतीय जनता पक्षात, सार्वजनिक बांधकाम मंत्री ना.रविंद्रजी चव्हाण यांच्या उपस्थितीत केला प्रवेश

देशाचे यशस्वी पंतप्रधान मा.नरेंद्रजी मोदी आणि भाजपा नेते व राज्याचे उपमुख्यमंत्री मा.देवेंद्रजी फडणवीस यांच्या कार्यशैलीवर विश्वास ठेवत तरुण पिढीचा भारतीय जनता पार्टीकडे येण्याचा कल वाढला आहे. आज सार्वजनिक बांधकाम तसेच अन्न व नागरी पुरवठा मंत्री मा.ना.रविंद्रजी चव्हाण साहेब यांच्या प्रमुख उपस्थितीत चिपळूण तालुक्यातील तरुण उद्योजक श्री.सचिन शिंदे यांच्या समवेत राष्ट्रवादी युवक कॉंग्रेस तालुका अध्यक्ष श्री.समीर पवार, राष्ट्रवादी विद्यार्थी कॉंग्रेस माजी तालुकाध्यक्ष श्री.वात्सल्य शिंदे, श्री.संतोष शिंदे, राष्ट्रवादी विद्यार्थी कॉंग्रेस माजी तालुका सरचिटणीस श्री.अभिजित मोहिते, श्री विक्रांत सावंत, श्री.सचिन नलावडे यांनी जाहिर प्रवेश केला. सर्वांना पुढील वाटचालीस ना.चव्हाण यांनी शुभेच्छा दिल्या. यावेळी माजी आ.डॉ.विनय नातू, जिल्हा कार्याध्यक्ष केदार साठे, जिल्हा सरचिटणीस रामदास राणे, नागेश धाडवे, चिपळूण तालुकाध्यक्ष वसंत ताम्हणकर, चिपळूण शहराध्यक्ष आशिष खातू तसेच चिपळूण तालुक्यातील पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.
|
Whatsapp आयकॉन दाबून ही बातमी शेअर करा |
Advertising Space













