नमस्कार आमच्या आजचा महाराष्ट्र टॉप टेन मराठी न्यूज चॅनेल मधे आपल स्वागत आहे...येथे तुम्हाला ताज्या घडामोडी व बातम्या मिळतील... बातम्या व जाहिरातींसाठी संपर्क - +91 9029198881 करा. आमचे YouTube चॅनेल, Facebook, Telegram ला सबस्क्राईब/ लाईक करा. , शिवसेना श्रीवर्धन शहर संघटनेच्या (उद्धव ठाकरे गट) मार्फत बाळासाहेब ठाकरे जयंती निमित्ताने विविध कार्यक्रम – आजचा महाराष्ट्र

शिवसेना श्रीवर्धन शहर संघटनेच्या (उद्धव ठाकरे गट) मार्फत बाळासाहेब ठाकरे जयंती निमित्ताने विविध कार्यक्रम

पत्रकार रामचंद्र घोडमोडे

रायगड (श्रीवर्धन) :- हिंदुह्रदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांची जयंती राज्यात सर्वत्र मोठ्या उत्साहात साजरी केली जाते. शिवसेना श्रीवर्धन शहर संघटनेच्या वतीने बाळासाहेब ठाकरे यांची जयंती साजरी करण्यात आली. शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे सर्वप्रथम छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेस पुष्पहार

अर्पण करून वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करण्यात आला.तसेच घोषणाही देण्यात आल्या यावेळी श्रीवर्धन शहर प्रमुख राजेश चव्हाण.उपशहर प्रमुख सुनील दर्गे युवा सेना अध्यक्ष शिवराज चाफेकर. उपाध्यक्ष शादाब पटेल. शाखाप्रमुख राकेश रटाटे .समीर सातम. माजी नगरसेवक अनंत गुरव. प्रतीक्षा माळी. महिला शहराध्यक्ष रुची बोरकर.उपशहर प्रमुख प्रियांका कदम. मनीष बोथरे. चांदोरकर. कडू. प्रशांत माळी. श्रीवर्धनकर मॅडम. तसेच निष्ठावंत शिवसैनिक उपस्थित होते.जयंती निमित्ताने शिवसेनेच्या वतीने कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. त्यामध्ये शासकीय रुग्णालय येथे फळ वाटप तसेच सायंकाळी ५ ते ८ च्या दरम्यान महिलांसाठी हळदीकुंकू समारंभ तसेच खेळ पैठणीचा या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

Whatsapp आयकॉन दाबून ही बातमी शेअर करा 

Advertising Space


मुक्त आणि खऱ्या पत्रकारितेसाठी ती कॉर्पोरेट आणि राजकीय नियंत्रणापासून मुक्त असणे आवश्यक आहे. लोक पुढे येऊन सहकार्य करतील तेव्हाच हे शक्य आहे.

आता दान करा

[responsivevoice_button voice="Hindi Female"]