नमस्कार आमच्या आजचा महाराष्ट्र टॉप टेन मराठी न्यूज चॅनेल मधे आपल स्वागत आहे...येथे तुम्हाला ताज्या घडामोडी व बातम्या मिळतील... बातम्या व जाहिरातींसाठी संपर्क - +91 9029198881 करा. आमचे YouTube चॅनेल, Facebook, Telegram ला सबस्क्राईब/ लाईक करा. , राष्ट्रीय रस्ता सुरक्षा अभियान सप्ताहाची उपप्रादेशिक परिवहन अधिकारी देवकाते यांच्या उपस्थितीत श्रीवर्धन मध्ये सांगता – आजचा महाराष्ट्र

राष्ट्रीय रस्ता सुरक्षा अभियान सप्ताहाची उपप्रादेशिक परिवहन अधिकारी देवकाते यांच्या उपस्थितीत श्रीवर्धन मध्ये सांगता

पत्रकार रामचंद्र घोडमोडे

रायगड (श्रीवर्धन) :- देशात दरवर्षी १ जानेवारी ते १७ जानेवारी या काळात राष्ट्रीय रस्ता अभियान सप्ताह साजरा करण्यात येतो. त्या निमित्ताने रायगड जिल्हा रस्ता सुरक्षा समिती विद्यमाने आयोजित रस्ता अभियान सप्ताहाची सांगता श्रीवर्धन मध्ये उपविभागीय अधिकारी अमित शेडगे यांच्या अध्यक्षते खाली उपप्रादेशिक परिवहन

अधिकारी देवकाते यांच्या उपस्थितीत उपविभागीय पोलिस अधिकारी प्रशांत स्वामी यांच्या प्रमुख उपस्थितीत झाली. यावेळी उपप्रादेशिक कार्यालय पेण विभागीय अधिकारी किरण पाटील. ठाकरे. सूर्यवंशी. यांची उपस्थिती होती. रस्ता सुरक्षा सप्ताह अभियानाच्या निमित्ताने श्रीवर्धन एस. टी स्टँड येथून छत्रपती शिवाजी चौक,बाजारपेठ, नारायण पाखाडी या एस. टी राऊंड वरून रॅली काढून उपविभागीय कार्यालय श्रीवर्धन येथे सांगता करण्यात आली.व सभा घेण्यात आली यावेळी उपस्थितीत वाहन चालकांना संबोधित करताना पेण येथे सुरक्षा सप्ताह काळात नेत्र तपासणीमध्ये १०१ जणांची तपासणी तसेच ५६ बॉटल रक्त दात्यांनी रक्तदान तसेच पेण महाड इतर ठिकाणी काढण्यात आलेल्या रॅली ची माहिती दिली.व रस्ते वाहतुकीचे महत्त्व समजावून सांगण्यात आले. फक्त गाडी चालवता येणे म्हणजे ड्रायव्हर नसून नियमांचे पालन करणे गरजेचे असल्याचे सांगितले.उप विभागीय पोलीस अधीक्षक प्रशांत स्वामी यांच्याकडून वाहतुकीचे नियम पाळण्याचे आवाहन यावेळी करण्यात आले.आपण जबाबदार नागरिक आहात. रोज अपघातांच्या बातम्या आपण पाहत असतो अपघात का होतात याचा विचार करणे गरजेचे असून लहान मुले गाडी चालवतात याला पालक जबाबदार आहेत. दारू पिऊन वाहन चालवणे वाहतुकीचे नियम न पाळणे प्रत्येकाने आपापली जबाबदारी ओळखली पाहिजे असे सांगितले. उप प्रादेशिक अधिकारी देवकाते यांनी हा कार्यक्रम आयोजित करण्याचा मूळ हेतू रोड सेफ्टी असून रायगड जिल्ह्यात एकूण ६०ते ७० कार्यक्रम राबविले असून अपघातांचे प्रमाण वाढले आहेत.ते ० वर आणण्याचे आव्हान यावेळी केले. उपविभागीय अधिकारी अमित शेडगे यांनी अध्यक्षीय भाषणात वाहन चालकां कडून राईट साईड ला जाते वेळी तसेच मागील वाहन ओव्हरटेक करते वेळी होणाऱ्या गोंधळाचे वर्णन केले.आपल्याला काय करायचे आहे ते दुसऱ्याला सांगणे गरजेचे आहे. अपघाताचे स्वरूप बदलले असून गाड्यांमध्ये सगळ्या सोयी सुविधा उपलब्ध असून सुद्धा

मागील काळात झालेल्या अपघातांचे उदाहरण दिले. आपण वाहन कसे चालवतो याच्यावर सर्व अवलंबून असून ट्रॅफिक सोडवणाऱ्यांना मदत करण्याचे आव्हान केले. यावेळी राष्ट्रीय सुरक्षा अभियान सप्ताहाचे औचित्य साधून विना अपघात सेवा देत असलेल्या प्रकाश अंबावले यांचे तसेच तीन वेळा रक्तदान केलेल्या रुची बोरकर हिचे पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यातआले. सुरक्षा अभियान सप्ताह निमित्ताने प्रादेशिक कार्यालय पेण अधिकारी वर्ग यांचे विचार तसेच नियमांची माहिती करून घेण्यासाठी श्रीवर्धन मधील वाहन चालक मोठ्या प्रमाणात उपस्थित होते. उपस्थितांचे आभार सहाय्यक परिवहन अधिकारी माधवराव सूर्यवंशी यांनी मानले

Whatsapp आयकॉन दाबून ही बातमी शेअर करा 

Advertising Space


मुक्त आणि खऱ्या पत्रकारितेसाठी ती कॉर्पोरेट आणि राजकीय नियंत्रणापासून मुक्त असणे आवश्यक आहे. लोक पुढे येऊन सहकार्य करतील तेव्हाच हे शक्य आहे.

आता दान करा

[responsivevoice_button voice="Hindi Female"]