नमस्कार आमच्या आजचा महाराष्ट्र टॉप टेन मराठी न्यूज चॅनेल मधे आपल स्वागत आहे...येथे तुम्हाला ताज्या घडामोडी व बातम्या मिळतील... बातम्या व जाहिरातींसाठी संपर्क - +91 9029198881 करा. आमचे YouTube चॅनेल, Facebook, Telegram ला सबस्क्राईब/ लाईक करा. , मुरुड आगारातील एस टी गाड्या वेळेत उपलब्ध करून वेळापत्रकानुसार कारभार सुधारला नाही तर जनआंदोलनं करू : मनसेचा इशारा आगार प्रमुखांना दिले निवेदन – आजचा महाराष्ट्र

मुरुड आगारातील एस टी गाड्या वेळेत उपलब्ध करून वेळापत्रकानुसार कारभार सुधारला नाही तर जनआंदोलनं करू : मनसेचा इशारा आगार प्रमुखांना दिले निवेदन

पत्रकार बाबुराव गोळे

रायगड (मुरुड) :- गेले कित्येक दिवसांपासून मुरुड आगारातील एस टी बस सेवा ही योग्य रित्या कार्यरत नसल्याने मुरूडच्या स्थानिक नागरिकांना व प्रवाशांना होणारा त्रास लक्षात घेऊन एस टी गाड्या वेळेत उपलब्ध करून वेळापत्रकानुसार कारभार सुधारला नाही तर वेळप्रसंगी जन आंदोलन करण्याचा इशारा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे शहर अध्यक्ष जागन पुलेकर यांनी आपल्या सहकाऱ्यांसमवेत आगार प्रमुख यांची भेट घेऊन देण्यात आला आहे.

गेले कित्येक दिवसांपासून मुरुड आगारातील एस टी बस सेवा ही योग्य रित्या कार्यरत नसल्याने, विद्यार्थ्याना आणि प्रवाश्यांना अनेक प्रकारच्या अडचणींना सामोरे जावे लागत आहे. हया संदर्भात अनेक तक्रारी मनसे कडे आल्यानंतर मनसे यावर आक्रमक भूमिका घेतली आहे. मुरुड हे एक पर्यटन स्थळ असल्याने येथील संपूर्ण रोजगार हा पर्यटन विभागवार अवलंबून आहे. बसेस च्या अश्या परिस्थितीमुळे येथील रोजगारावर देखील परिणाम होत आहे. त्याचबरोबर अनेक गोष्टींचा आणि वैद्यकीय सोयी सुविधांचा अभाव असल्याने नागरिकांना शहराबाहेर प्रवास करणे अनिवार्य आहे. अश्यात शहरातील सामान्य नागरिक आणि सामान्य पर्यटक आपल्या आगारातील गाड्या वेळेवर हजर नसल्याने , त्यात यांत्रिक भिगड असल्याने , अनेकदा चालक उपलब्ध नसल्याने अश्या अनेक कारणे यांची सर्वांची गैरसोय होत आहे.

शहरातील हात मजूर आणि रोजी वरील महिला वर्गाना वेळेवर शकामावर येणे जाणे देखील कठीण झाले आहे. शालेय विद्यार्थ्यांना परीक्षांच्या दरम्यान अनेकदा वेळेत पोचण्यास अडचणी येत आहेत.

मनसेने या पत्राद्वारे अशी विनंती केली आहे की वरील बाबी लवकरात लवकर सुधारतील या करिता आपण तातडीने आवश्यक ती कारवाई करावी. येत्या आठवडाभरात परिस्थीती न सुधारल्यास मनसे आपल्या अंधाधुंद कारभारा विरोधात जन आंदोलन करेल याची आपण नोंद घ्यावी.

त्याच बरोबर काही महिन्यांपर्वीच मनसे मुरुडच्या वतीने आपले मुरूड आगर चे मॅनेजर यांना पत्राद्वारे मागणी केलेल्या विषयानुसार सर्व गाड्यांचे इंडिकेटर आणि वायपर सुरळीत चालू असावेत यावर केलेली कारवाई आणि उपाय योजनेची माहिती देखील मागितली आहे.

यावेळी मनसेचे शहर अध्यक्ष जागन पुलेकर,शारीरिक सेना तालुका अध्यक्ष आशिष खोत विध्यार्थी सेना तालुका अध्यक्ष युवराज भगत विध्यार्थी सेना शहर अध्यक्ष अथर्व खोत विभाग अध्यक्ष आकाश खोत, मनिष शामा, सिद्धेश खेडेकर,सुजित गुरव, अजिंक्य इंगळे यांसह सूरज जैस्वाल, प्रथमेश अंबुकर,निखिल कासेकर, अथर्व मसाल,ओम मयेकर मनसैनिक उपस्थित होते.

Whatsapp आयकॉन दाबून ही बातमी शेअर करा 

Advertising Space


मुक्त आणि खऱ्या पत्रकारितेसाठी ती कॉर्पोरेट आणि राजकीय नियंत्रणापासून मुक्त असणे आवश्यक आहे. लोक पुढे येऊन सहकार्य करतील तेव्हाच हे शक्य आहे.

आता दान करा

[responsivevoice_button voice="Hindi Female"]