पनवेल मध्ये चहा टपरीवर अवैध पद्धतीने दारू विक्री करणाऱ्यावर पोलिसांची कारवाई….

रायगड (पनवेल) :- पनवेल तालुक्यातील बंबावीपाडा या विभागात एका चहाच्या टपरीवर विनापरवाना मद्यविक्री सुरू होती. पनवेल शहर पोलिसांना अवैध पद्धतीने दारू विक्री सुरू असल्याची बातमी मिळाली. बातमी मिळताच पोलिसांनी या चहाच्या टपरीवर धडक दिली. आणि विनापरवाना दारूची विक्री करणाऱ्या, चहा विक्रेत्याला ताब्यात घेतले. त्याच्याकडून देशी दारूच्या २७ बाटल्या जप्त करण्यात केल्या. व पुढील कारवाईसाठी त्याला पोलिस ठाण्यात नेण्यात आले.
बंबावीपाडा येथे एका चहाच्या टपरीवर मागील काही महिन्यांपासून चहा विक्री करणारा लपून अवैधरित्या विनापरवाना दारूची विक्री करत होता. विनापरवाना दारू विक्री करणे हा कायद्याने गुन्हा आहे. हे माहिती असून ही सदर चहा विक्रेता दारूची विक्री छुप्या पद्धतीने चहाच्या टापरीवरून करत होता. अवैध पद्धतीने दारूचा व्यापार करण्याची बातमी पोलिसांना मिळाली. पनवेल पोलिसांनी त्वरित सापळा रचून या टपरी धारकला पकडले. व त्याच्या कडून सुमारे १०००/- रुपयांच्या देशी दारूच्या २७ बाटल्या जप्त करून त्याला ताब्यात घेतले.
पनवेल तालुक्यात बहुतेक ठिकाणी पोलिसांपासून लपून चहा टपऱ्यांवर, काही दुकानांवर अवैध पद्धतीने गुटखा विक्री, दारू विक्री केली जाते. हा अवैध धंदा शहरीभागात कमी परंतु ग्रामीण भागात सर्रासपणे केला जातो. अशा पध्दतीने धंदा करणाऱ्यांवर पनवेल पोलिसांचे बारीक लक्ष असते. अशा प्रकारच्या बातम्या मिळताच पनवेल पोलिसांकडून धडक कारवाई ही केली जाते. परंतु बेकायदेशीर पध्दतीने अशा प्रकारचा धंदा करणारे ही फार चतुर असतात. कुणास ठाऊक पोलिस कारवाईसाठी निघालेत याची बातमी त्यांच्या कडे पोलिस येण्या आगोदरच प्राप्त होते. आणि मग ते सतर्क होऊन आपला सर्व माल पोलिस येण्या आगोदरच लपवतात. त्यामुळे पोलिसांनी अशा सुत्रधारावर ही कारवाई केली पाहिजे. त्यामुळे अवैध पद्धतीने धंदा करणाऱ्यांवर कायद्याचे वचक बसेल व अवैध धंद्यांना ही आळा बसेल.
|
Whatsapp आयकॉन दाबून ही बातमी शेअर करा |
Advertising Space













